- मेष (ARIES) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा भागात असेल. आज आपल्या रागीट स्वभावावर संयम ठेवणं हिताचं राहील. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळं कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती आणि नियोजन ह्यापासून दूर राहावे. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.
- वृषभ (TAURUS) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भागात असेल. आज खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. मुलांनसाठी खर्च होईल.
- मिथुन (GEMINI) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा भागात असेल. आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्यादृष्टीनं अनुकूल आहे. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. शेजार्यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल.
- कर्क (CANCER) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा भागात असेल. आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैधबाबींपासून दूर राहावे. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.
- सिंह (LEO): सिंह राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भागात असेल. आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्याविषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. बोलणं-वागणं संयमित ठेवावे लागेल. रागाचं प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
- कन्या (VIRGO) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या बारावा भागात असेल. आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मित्रांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. अचानकपणे खर्च वाढतील. शक्यतो वाद व संघर्षापासून दूर राहावे.
- तूळ (LIBRA) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या लाभात भागात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्यानं आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल आणि त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.
- वृश्चिक (SCORPIO) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्याप्रगतीमुळं आनंदित व्हाल.
- धनू (SAGITTARIUS) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज प्रकृती नरम राहील. शारीरिकदृष्टया आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचं नियोजन जपून करावं. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांशी दोन हात करावे लागतील.
- मकर (CAPRICORN): सिंह राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील आणि त्यामुळं व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. राग नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.
- कुंभ (AQUARIUS) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज खंबीर मन आणि आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास-सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारांकडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल.
- मीन (PISCES) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल, आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अतिउत्साह व राग काढून टाकणे हिताचे राहिल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरून एखादी चांगली बातमी मिळेल.
हेही वाचा -
- शारदीय नवरात्र 2024; अशी करा घरात घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य - Navratri 2024
- शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours
- पितरांची तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला 'या' पितरांचं करा श्राद्ध; जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ - Sarvapitri Amavasya 2024