ठाणे - ठाण्यातील रेमंड कंपनीच्या मैदानात व्हिंटेज गाड्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळी वाहने चालवण्याचा आनंद घेता आला. यावेळी त्यांच्यासोबत रेमंडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हेदेखील होते.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करायचे. यावेळी त्यांनी आयुष्यातील सुरुवातीच्या काळातील आठवणींचं स्मरण केलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील कार आणि बाईकबद्दल कौतुक केलं. सोशल मीडियातील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, ज्या वाहनातून मी माझे जीवन सुरू केले, ती ऑटोरिक्षा चालवली. त्याचबरोबर प्युअर जीटीआय बाईक आणि व्हिंटेज कार चालवण्याचा आनंद मिळाला". एकनाश शिंदे यांनी नारंगी रंगाची सुपरबाईकदेखील चालवली.
वाहनांच्या प्रदर्शनात सुमारे ७०० वाहने- रेमंडचे मालक गौतम सिंघानिया हे जुन्या व्हिंटेज वाहनांच्या हौसेसाठी ओळखले जातात. त्यांना रेसिंग कारदेखील आवडतात. त्यामुळेच दरवर्षी वाहन प्रदर्शन रेमंडकडून भरवण्यात येतं. यावर्षी याच प्रदर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे रेमंड मैदानात आले. या ठिकाणी असलेल्या नव-नवीन वाहनं चालवण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मग त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि इतर वाहने चालवत या प्रदर्शनाचा आनंद घेतला. या प्रदर्शनात देशभरातील जुन्या आणि नवीन वाहनांचा समावेश असतो. हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजारो लोक दरवर्षी या प्रदर्शनाला भेट देत असतात. नवनवीन वाहनांची आवड असणारे हजारो नागरिक या प्रदर्शनाला भेट देत असतात. ते वाहनांची माहितीदेखील घेतात. प्रदर्शनात १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सुमारे ७०० वाहने ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १९०३ ची व्हिंटेज कार, रोल्स रॉयस कारसह सुपरबाईकचा समावेश आहे.
- शहरात रेमंड कंपनीची शताब्दी साजरे करण्यासाठी 'रेमंड कंपनी' आणि 'सुपर क्लब' यांनी संयुक्तपणे 'ऑटोफेस्ट-२०२५' ऑटो कार महोत्सवाचं आयोजन केलं होतं. वाहन प्रदर्शनाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, वाहन मालक आणि असंख्य वाहनप्रेमी उपस्थित राहिले.
हेही वाचा-