ETV Bharat / state

शांततापूर्ण, पारदर्शी निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांनी काम करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण - maharashtra assembley election 2019

बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
author img

By

Published : Sep 25, 2019, 6:47 PM IST

रत्नागिरी- विधानसभा निवडणूक 2019 अंतर्गत मतदानाचा टक्का वाढवणे व शांततापूर्वक वातावरणात पारदर्शीपणे मतदान व्हावे. यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. निवडणूक पुर्वतयारी संदर्भात जिल्ह्यातील पाच मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व विविध नोडल अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बैठक

हेही वाचा- पवारांवर ईडीच्या कारवाईचे बारामतीत पडसाद, कडकडीत बंद

या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक पूर्वतयारीचा यावेळी विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी बेलदार यांनी यावेळी आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक विषयक कायदे याबाबत सादरीकरण केले.

धडक कारवाई करा-
मालमत्ता विद्रुपीकरण संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करावी. याबाबत असलेल्या कायद्यातील कलम 7 अनुसार धडक कारवाई करुन पाच पट दंड लावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निवडणूक काळात आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी सतर्क रहा, असे सांगून चव्हाण म्हणाले की, सर्वांनी नेमून दिलेले काम योग्यरित्या करण्याची खबरदारी घ्यावी. यावेळी जिल्ह्यात बदलीने आलेल्या विविध अधिकाऱ्यांनी सर्वांना परिचय दिला. पोलीस प्रशासनाची भूमिका आणि विविध प्रकारचे कामे व तयारी याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मार्गदर्शन केले.

Intro:शांततापूर्ण व पारदर्शी निवडणूकीसाठी
अधिकाऱ्यांनी काम करावे --- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

रत्नागिरी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक 2019 अंतर्गत मतदानाचा टक्का वाढवणे व शांततापूर्वक वातावरणात पारदर्शीपणे मतदान व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
                  निवडणूक पुर्वतयारी संदर्भात जिल्हयातील पाच मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व विविध नोडल अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक पूर्वतयारीचा यावेळी विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी बेलदार यांनी यावेळी आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक विषयक कायदे याबाबत सादरीकरण केले.

*धडक कारवाई करा*

                  मालमत्ता विद्रुपीकरण संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करावी याबाबत असलेल्या कायद्यातील कलम 7 अनुसार धडक कारवाई करुन पाच पट दंड लावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
                  निवडणूक काळात आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी सतर्क रहा असे सांगून चव्हाण म्हणाले की सर्वांनी नेमून दिलेले काम योग्यरित्या करण्याची खबरदारी घ्यावी.
                  यावेळी जिल्हयात बदलीने आलेल्या विविध अधिकाऱ्यांनी परिचय सर्वांना दिला.
                  पोलीस प्रशासनाची भूमिका आणि विविध प्रकारचे कामे व तयारी याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मार्गदर्शन केले.
Body:शांततापूर्ण व पारदर्शी निवडणूकीसाठी
अधिकाऱ्यांनी काम करावे --- जिल्हाधिकारी सुनील चव्हाणConclusion:शांततापूर्ण व पारदर्शी निवडणूकीसाठी
अधिकाऱ्यांनी काम करावे --- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.