ETV Bharat / state

नाणार पुन्हा 'पेटणार'? मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान... - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्प होण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे नाणारला प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री
author img

By

Published : Sep 17, 2019, 9:03 PM IST

Updated : Sep 18, 2019, 9:50 AM IST

रत्नागिरी - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्प होण्याचे संकेत दिले आहेत. थेट राजापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांना प्रकल्पासंबंधीची सकारात्मक भूमिका सष्ट केली. यामुळे नाणारला प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी आमची पहिल्यापासून मागणी होती. तसेच हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असून, यामुळे कोकणातील एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच स्थानिकांमधील उत्साह पाहता प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या लोकांना पुन्हा चर्चेसाठी बोलवण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. यानंतर रत्नागिरीच्या जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्यांचा फडणवीस यांनी समाचार घेतला. तसेच ईव्हीएम वरून काँग्रेस व राष्ट्रवादीची त्यांनी खिल्ली उडवली. या लोकसभेच्या पराभवानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे एकही पहिलवान उरला नसल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

नाणार रिफायनरीला झालेल्या विरोधामुळे प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. मात्र, नागरिकांचा उत्साह बघता याबाबत पुन्हा एकदा चर्चा करावी, असे वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत आज कुठलाही निर्यण जाहीर करत नाही. मात्र, लवकरच यावर चर्चा करू, असेही ते म्हणाले.

काय आहे नाणार प्रकल्प प्रकरण?
आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच १ लाख रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, युतीमधीलच शिवसेनेने आणि नारायण राणे यांनी प्रकल्पाला विरोध केल्याने सरकारची कोंडी झाली होती.

नाणार पुन्हा पेटणार; मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...

नाणार प्रकल्पाला का होत आहे विरोध?
नाणार प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सुमारे ८ हजार शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागणार आहे. त्यामुळे ३ हजारहून अधिक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती आहे. या सर्व कारणांमुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. संपादित जमिनीवर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा आहेत. शिवाय हा प्रकल्प कोकण किनारपट्टीवर उभारण्यात येत असल्याने हजारो मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचीही भीती आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे.

Intro:रत्नागिरी

रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

राजापूरमध्ये केलं वक्तव्य

रिफायनरी बाबत मुख्यमंत्री सकारात्मक

ही ग्रीन रिफायनरी आहे

या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे

ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला

पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय - मुख्यमंत्री

आज मी कोणता निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार - मुख्यमंत्रीBody:रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्यConclusion:रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
Last Updated : Sep 18, 2019, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.