ETV Bharat / state

कर्जत तालुक्यातील पेठ किल्ल्यावर सापडली ब्रिटिशकालीन तोफ

सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी कोथळीगडावरील ही तोफ गावकऱ्यांच्या माहितीवरून शोधून काढली आहे. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या १०० फूट खोल अंतरावर एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली ४.५ फुट लांबीची तोफ सापडली.

कर्जत तालुक्यातील पेठ किल्ल्यावर ब्रिटिशकालीन तोफ  सापडली आहे.
author img

By

Published : Apr 9, 2019, 3:23 PM IST

रायगड - जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोथळीगडावर म्हणजेच पेठ किल्ल्यावर एक ब्रिटीशकालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील पेठ किल्ल्यावर ब्रिटिशकालीन तोफ सापडली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी कोथळीगडावरील ही तोफ गावकऱ्यांच्या माहितीवरून शोधून काढली आहे. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या १०० फूट खोल अंतरावर एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली ४.५ फुट लांबीची तोफ सापडली. त्यानंतर तिला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी रविवारी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम राबवण्यात आली.

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तोफेला मातीतून बाहेर काढून दोरखंडाच्या साहाय्याने १०० फूटवर असलेल्या प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. जवळपास ५ तास चाललेल्या या मोहिमेमध्ये संस्थेच्या ६० सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवसंजीवनी दिली. गावकऱ्यांनी या मोहिमेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच पुरातत्व विभागाने केलेल्या सहकार्य बद्दल देखील आभार व्यक्त केले. दरम्यान, लवकरच या तोफेला तिचे पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागामार्फत तोफगाडा बसविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.

Intro:कर्जत तालुक्यातील पेठ किल्यावर सापडली ब्रिटिश कालीन तोफ

सह्याद्री प्रतिष्ठानने दिली नवसंजीवनी

रायगड : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोथळीगडावर म्हणजेच पेठ किल्ल्यावर एक ब्रिटीश कालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ प्रवेशद्वार पासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे.Body:सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी कोथळीगडावरील ही तोफ गावकऱ्यांच्या माहितीवरून शोधून काढली आहे. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या 100 फूट खोल अंतरावर एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली 4.5 फुट लांबीची तोफ सापडली. त्यानंतर तिला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी रविवारी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम राबवण्यात आली.Conclusion:संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तोफेला मातीतून बाहेर काढून दोरखंडाच्या साह्याने 100 फूट वर असलेल्या प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. जवळपास 5 तास चाललेल्या या मोहिमेमध्ये संस्थेच्या 60 सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवसंजीवनी दिली. गावकऱ्यांनी या मोहिमेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच पुरातत्व विभागाने केलेल्या सहकार्य बद्दल देखील आभार व्यक्त केले. दरम्यान, लवकरच या तोफेला तिचे पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागामार्फत तोफगाडा बसविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.