ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे - भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड - fadnavis underworld connection allegation

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे असल्याची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली आहे. ते आज गणपतीपुळे येथे बोलत होते.

Prasad Lad criticize nawab malik
नवाब मलिक आरोप प्रसाद लाड प्रतिक्रिया
author img

By

Published : Nov 10, 2021, 6:02 PM IST

रत्नागिरी - देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे असल्याची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली आहे. ते आज गणपतीपुळे येथे बोलत होते.

प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड

हेही वाचा - नावेद-2 बोटीचा अपघातच.. याला जिंदाल कंपनीचे जहाज जबाबदार, न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा मच्छिमारांचा इशारा

आमदार प्रसाद लाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत हे मंत्री नवाब मलिक यांनी आधी पहावे, आरोप करणारे नवाब मलिक हे स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. नवाब मलिक यांनी असे आरोप करणे म्हणजे त्यांना वेड लागल्यासारखे आहे. नवाब मलिक यांची नैतिकता आता संपलेली असल्याची टीका लाड यांनी केली.

नवाब मलिक यांचे फडणवीसांवर 'हे' आरोप

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.9 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेच मलिक यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये मलिक यांनी आपल्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाला उत्तर देताना, हा विषय फडणवीस यांनी सुरू केला आहेच तर आता मी हायड्रोजन बॉम्ब फोडतो म्हणत फडणवीस यांचे कुणाशी संबंध आहेत हे पत्रकार परिषदेत सांगणार आहे असे जाहीर केले होते. त्यावर आज मलिक यांनी फडणवीसांच्या काळात गुंडाना शासकीय पदांवर बसवले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अंडरवर्ल्डचे लोक कसे, यासह अनेक गंभीर आरोप केले.

हैदर आझम याला मौलाना आझाद बोर्डाचा अध्यक्ष बनवले

फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळात गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना शासकीय पदावर बसवले गेले. यामध्ये मुन्ना यादवला फडणवीसांनी मंडळाचे अध्यक्ष केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच, हैदर आझम याला मौलाना आझाद बोर्डाचा अध्यक्ष बनवले. तो बांगलादेशी लोकांना देशात आणतो. तसेच त्याची बायको बांगलादेशी आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.

रियाज भाटीच्या मदतीने फडणवीसांनी वसुलीचे रॅकेट चालवले

अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या रियाज भाटीच्या मदतीने फडणवीसांनी वसुलीचे रॅकेट चालवले, असे म्हणत तो फडणवीसांसोबत का असतो? असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला. त्याचे आणि फडणवीस यांचे काय कनेक्शन आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल मलिकांनी उपस्थित केला. त्याचबरोबर 14 कोटींच्या बनावट नोटांचे प्रकरण फडणवीस यांनी दाबण्याचे काम केले. ते कुणासाठी व का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.

बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला 2015 मध्ये अटक, मात्र आता फरार

बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, तो आता फरार आहे. तो कसा काय फरार झाला? त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डच्या गुंडांकडून वसुली सुरू केली होती, असा आरोप मलिकांनी केला आहे. रियाज भाटी, हाजी अराफत यांच्याशी फडणवीसांचे काय संबंध आहेत? हे त्यांनी उघड करावे, असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज रियाज भाटी, मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हैदर या प्रमुख चार व्यक्तींची नावे घेतली आहेत. यातील रियाज भाटीचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे. तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात व्हीआयपी पाससह कसा काय गेला होता? असाही सवाल त्यांनी केला.

हेही वाचा - रत्नागिरीत मोठ्या बोटीने धडक दिल्याने 'नावेद 2' बुडाली? 1 खलाशाचा मृतदेह सापडला, 5 बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.