ETV Bharat / state

आयटी इंजिनिअर असूनही गेल्या 3 वर्षांपासून 'ती' साकारतेय सुबक 'गणेशमूर्ती' - शाडूच्या मुर्ती

सामान्यपणे गणेशमुर्ती तयार करण्यात अनेक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी पहायला मिळते.मात्र, रत्नागिरीतील एका मूर्तीशाळेत एक उच्चशिक्षित तरुणी गणेशमूर्ती बनवत आहे.आयटी इंजिनिअर असलेली कश्मिरा सावंत अतिशय सुबक आणि देखण्या  गणेशमूर्ती तयार करते.

कश्मिरा सावंत
author img

By

Published : Aug 23, 2019, 9:24 PM IST

रत्नागिरी - गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. सर्व गणेश भक्तांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. मूर्तीशाळांमध्येही सध्या लगबग दिसून येत आहे. कारागीर मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. रत्नागिरीतील एका मूर्तीशाळेत एक उच्चशिक्षित तरुणी गणेशमूर्ती बनवत आहे.

आयटी इंजिनिअर असूनही गेली 3 वर्ष 'ती' साकारते सुबक 'गणेशमूर्ती'
आयटी इंजिनिअर असलेली कश्मिरा सावंत अतिशय सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती तयार करते. सामान्यपणे गणेशमूर्ती तयार करण्यात अनेक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी पहायला मिळते. पण कश्मिराने ही मक्तेदारी मोडीत काढली आहे. मागील तीन वर्ष सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती तीने साकारल्या आहेत.कश्मिरा पुर्णपणे शाडूच्या मुर्ती साकारते. यावर्षी कश्मिराने साकारलेल्या गणेशमूर्ती मुंबई, पुणे, कर्नाटकात जाणार आहेत. गणेशमूर्तीमधील जिवंतपणा कश्मिराच्या हातच्या कलेतून सहज साकारला जातो. गणरायाच्या अंगावरील दागिने सजवण्यात कश्मिराचा हातखंडा आहे. त्यामुळे काहींना खास तिच्याच हातून साकारलेली गणेशमूर्ती हवी असते.आयटी इंजिनिअर असलेली कश्मिरा नोकरी न करता गणपतीच्या मुर्ती साकारते. इतरांपेक्षा आपली मुलगी काहीतरी वेगळ करत असल्याने कश्मिराचे आई-वडिल सुद्धा कश्मिराला पाठिंबा देतात.

Intro:आयटी इंजिनिअर असूनही गेली 3 वर्ष 'ती' साकारते सुबक 'गणेशमूर्ती'

रत्नागिरी, प्रतिनिधी

गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे.. त्यामुळे अनेकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. मूर्तीशाळांमध्येही सध्या लगबग दिसून येत आहे.. मात्र रत्नागिरीतल्या एका मूर्तीशाळेत चक्क एक उच्चशिक्षित तरुणी साकारतेय गणेशमूर्ती.. अतिशय सुबक आणि देखण्या मूर्ती ती साकारते. कोण आहे ही तरुणी, उच्चशिक्षित असूनही ती नेमकी का वळलीय या क्षेत्राकडे, घरच्यांना तिच्या नेमकं काय वाटतंय, पाहूया यासंदर्भात एक स्पेशल रिपोर्ट...

व्हिओ-१- गणेशमुर्तीवर अत्यंत सराईत पद्धतीने हात फिरवणारी हि आहे कश्मिरा सावंत. आयटी इंजिनिअर असलेल्या रत्नागिरीतल्या कश्मिरानं तरुणींच्या पुढे नवा आदर्श ठेवलाय. सुबक आणि आकर्षक गणेशमुर्ती काढण्यासाठी अनेक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी पहायला मिळते. पण हि मक्तेदारी मोडीत काढत कश्मिरा सावंत गेली तीन वर्ष सुबक आणि देखण्या गणेशमुर्ती बनवण्याचे काम करतेय. लहानपणापासून गणपतीच्या मुर्तीच्या कुतुहलामुळे कश्मिरा याकडे वळली. आणि आयटी इंजिनिअर पुर्ण करुन देखिल गेली तीन वर्ष ती गणेशमुर्ती घडवण्याचे काम करतेय. ती पूर्णतः शाडू मातीच्या मूर्ती साकारते..

बाईट-१- कश्मिरा सावंत. गणेशमुर्ती घडवणारी तरुणी

व्हिओ-२- कश्मिराची खासीयत आहे ती दागिने घडवण्याची.. गळ्यातील हार, मुकुटावरचे विविध हार,बाजूबंद,कमरपट्टा, अंगठी, पैजण किंवा सोडेवरचे दागिने घडवण्याची कश्मिराची खासीयत आहे. पेशवाईराज, टिटवाळा गणपती,बाळ गणपती आणि मयुरासनावरचा गणपती रेखाटण्याची कश्मिराची खासीयत आहे. एक फुटापासून ते साडेचार फुटांपर्यत ती गणपती साकारते. यापुढेही तिला याच क्षेत्रात पुढे जायचं आहे.

बाईट-२- कश्मिरा सावंत. गणेशमुर्ती घडवणारी तरुणी

व्हिओ-३- मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कश्मिराने तीन वर्षात ६० हून अधिक गणपती साकारलेत. त्यामुळे तिच्या हातात गणेशमुर्ती साकारण्याची कला पाहून तीचे आई वडिल सुद्धा थक्क होतात.आयटी इंजिनिअर असल्याने मोठी नोकरी न करता गणपतीच्या मुर्ती साकारण्यात कश्मिरा उतरल्याने तीचे आई वडिल सुद्धा कश्मिराला सपोर्ट करतात.

बाईट-३- राधिका सावंत. कश्मिराची आई

व्हिओ-४- कश्मिरा पुर्णपणे शाडूच्या गणरायाच्या मुर्ती साकारते. यावर्षी कश्मिराने साकारलेल्या गणेशमुर्ती मुंबई, पुणे, कर्नाटकात जाणार आहेत. गणेशमुर्तीमधील जिवंतपणा कश्मिराच्या हातच्या कलेतून सहज साकारला जातो. गणरायाच्या अंगावरील दागिने सजवण्याचा हातखंडा कश्मिराच्या हातात सहजपणे आलाय. त्यामुळे काहींना खास तिच्याच हातातून साकारलेली गणेशमूर्ती हवी असते..

बाईट-४- मानसी खानविलकर.

व्हिओ-५- दिवसरात्र एक करुन सध्या कश्मिरा सहजतेने गणेशमुर्ती साकारतेय. पुरषांना लाजवले असं कौशल्य सध्या कश्मिरा आत्मसाद करतेय. विविध आकारातील गणेशमुर्ती घडवण्यात सध्या कश्मिरा गुंतली आहे. तिचा हा प्रवास या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे...Body:आयटी इंजिनिअर असूनही गेली 3 वर्ष 'ती' साकारते सुबक 'गणेशमूर्ती'Conclusion:आयटी इंजिनिअर असूनही गेली 3 वर्ष 'ती' साकारते सुबक 'गणेशमूर्ती'
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.