रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते कुवारबाव मार्गावर अनधिकृत बांधकामांचे जाळे पसरले होते. गेल्या काही महिन्यांत अशी अनधिकृत बांधकामे या परिसरात उभी राहत असल्याने, नागरिक नाराजी व्यक्त करत होते. विशेष म्हणजे हे अनधिकृत बांधकाम असतानाही त्यांना ग्रामपंचायतीकडून पावत्या मिळत होत्या. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी या अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाली आहे.
पोलीस बंदोबस्तात कारवाई
महामार्गलगतची ही बांधकामे हटवली जात नव्हती. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत उदय सामंत यांनी कोल्हापूरहून आलेल्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ही बांधकामे जर पाडली नाहीत तर कारवाई करू असा इशारा दिला. दरम्यान सावंत यांच्या इशाऱ्यानंतर ही अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू असून, सुरुवातीला सिंचन भवन परिसरातील बांधकाम पाडण्यात येत आहे.
हेही वचा - मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे