रत्नागिरी - रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू ( Russia Ukraine invasion ) झाले आहे. हजारो भारतीय सध्या युक्रेनमधे अडकून पडले ( Indians stuck in Ukraine ) आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश ( 8 Students Stuck in Ratnagiri ) आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील तीन तर चिपळूण, मंडणगड, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यातील एक अशा एकूण आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये अद्वैत विनोद कदम, साक्षी प्रकाश नरोटे, जान्हवी उमाकांत शिंदे, वृक्षभनाथ राजेंद्र मोलाज, आकाश अनंत कोगनाक, मुस्कान मन्सुर सोलकर, सलोनी साजीद मनेर, ऐश्वर्या मंगेश सावंत अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील सहाजण एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला, एक विद्यार्थीनी दुसर्या वर्षाला तर एक विद्यार्थी तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे.
खरकिवमध्ये परिस्थिती चिघळली
युक्रेनमधील युद्धानंतर परिस्थिती बदलत ( Situation in Ukraine ) आहे. असे असले तरी जिल्ह्यातील विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती पालकांनी प्रशासनाला ( Indians students safe in Ukraine ) दिली आहे. देवरूख येथील अद्वैत कदम, साक्षी नरोटे, जान्हवी शिंदे अशी या 3 विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तीनही विद्यार्थी खरकिव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. खरकिवमध्ये परिस्थिती चिघळली आहे. विद्यार्थ्यांना बँकर्समध्ये सुरक्षितरित्या हलविले गेले आहे.
हेही वाचा-Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन संकटावर ज्योतिषशास्त्राची गणना; जाणून घ्या...
युक्रेनमधून भारतात परत आणावे, विद्यार्थ्यांची मागणी-
सध्या या विद्यार्थ्यांकडे 3 ते 4 दिवस पुरेल इतका अन्नधान्याचा साठा शिल्लक आहे. बाहेर झडणाऱ्या गोळ्यांच्या फयरी, रणगाड्यांचे आवाज, विमानांचा वावर यामुळे सध्या तेथील परिस्थिती आणखीनच बिघडत आहे. युक्रेन प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात आहे. तरी युद्ध परिस्थितीचा अंदाज घेत सुरक्षित ठिकाणी किंवा भारतात परत आणावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा-Almond Milk Consumption : बदाम दुधाच्या सेवनाने शरीराला होतात 'हे' फायदे