ETV Bharat / state

कोकण रेल्वेने २० दिवसात ६८ हजार ७५९ कामगारांना पोहोचवले घरी

author img

By

Published : May 29, 2020, 6:03 PM IST

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. अचानक आलेल्या या संकटाच्या काळात कोकण रेल्वेने मालगाडींची वाहतूक सुरू ठेवत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत निर्माण होणारी टंचाई टाळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Ratnagiri
कामगारांना रेल्वेत सोडताना

रत्नागिरी - लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यानंतर कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ हजार ७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे. या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५ हजार ६७७ परप्रांतीय कामगार आणि कुटुंबीयांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.

दिलासादायक; कोकण रेल्वेने २० दिवसात ६८ हजार ७५९ कामगारांना पोहोचवले घरी

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. अचानक आलेल्या या संकटाच्या काळात कोकण रेल्वेने मालगाडींची वाहतूक सुरू ठेवत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत निर्माण होणारी टंचाई टाळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या खताचा पुरवठाही या तिन्ही राज्यांच्या विविध भागांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. आता गेल्या वीस दिवसापासून कोकण रेल्वे कामगार आणि त्यांच्या अडकलेल्या कुटुंबीयांना विविध राज्यात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम नियोजनबद्ध रितीने करत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लॉकडाऊनपासून विविध राज्याचे हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांसाठी खास ट्रेन सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या १३ श्रमिक स्पेशल ट्रेनमधून १५ हजार ६७७ श्रमिक आणि त्यांचे कुटुंबीय रवाना झाले. रत्नागिरी सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन ट्रेनमधून ४०१६, बिहारला दोन ट्रेनच्या माध्यमातून २६४३, कर्नाटकमध्ये तीन ट्रेनच्या माध्यमातून ३६८०, झारखंड येथे तीन ट्रेनच्या माध्यमातून ३५०१, मध्यप्रदेशला एक ट्रेनच्या माध्यमातून ११६४ तर राजस्थानला एक ट्रेनच्या माध्यमातून ६७३ कामगार रवाना झाले. गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातूनही कोकण रेल्वेच्या माध्यमातून श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशाच्या विविध भागात पोहोचवण्यात आले.

गोव्यातून ३६ ट्रेनच्या माध्यमातून ५० हजार ५१८ श्रमिक त्यांच्या घरी पोहोचले. तर कर्नाटकमधून दोन ट्रेनच्या माध्यमातून २५६४ कामगार आणि कुटुंबीयांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. कोकण रेल्वेच्या मार्गावर श्रमिकांची ही वाहतूक अजूनही सुरु आहे. पुढील काही दिवसात मागणीनुसार श्रमिकांना त्यांच्या घरी त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी कोकण रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. गेल्या वीस दिवसात या हजारो कामगारांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकारी वर्गापासून कामगार वर्गापर्यंत सगळ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि महसूल पोलीस आणि एसटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हजारो कामगार त्यांच्या सामानासह जाताना करण्यात आलेल्या अचूक नियोजनामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात कोकण रेल्वेला यश आले. या कामगारांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणादेखील अक्षरशः रात्रंदिवस झटत होती. परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांना त्यांच्या वास्तव्य स्थानापासून रेल्वे स्थानाकापर्यंत आणणे, त्यांना गाडीमध्ये बसवण्यापासून ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंतची जेवणाची व पिण्याच्या स्वछ पाण्याची सोय करणे, या एकंदरीतच सर्व व्यवस्थेकरिता कोकण रेल्वे व रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जिल्हा प्रशासन यंत्रणांनी उत्तम समन्वय राखून काम केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.