ETV Bharat / state

अलिबागमध्ये १८ गावांतील ग्रामस्‍थांनी हाती घेतली गाळ उपसण्‍याची मोहीम

उमटे धरण १९८० साली बांधण्‍यात आले आहे. या धरणाकडे रायगड जिल्‍हा परिषदेचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंत या धरणातील गाळ एकदाही उपसण्यात आला नाही. त्‍यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे परिसरातील तरूणांनी एकत्र येवून याबाबत जनजागृती केली आणि ग्रामस्‍थांना गाळ उपसण्‍याच्‍या कामासाठी प्रवृत्‍त केले. यानंतर आता शेकडो ग्रामस्‍थांचे हात गाळ उपसण्‍याच्‍या कामाला लागले आहेत.

ग्रामस्‍थांनी हाती घेतली गाळ उपसण्‍याची मोहीम
author img

By

Published : May 2, 2019, 7:16 PM IST

रायगड - अलिबाग तालुक्‍यातील जवळपास ७० गावे आणि वाड्यांना उमटे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, या धरणाकडे रायगड जिल्‍हा परिषदेचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिसरातील १८ गावांतील ग्रामस्‍थांनी एकत्र येऊन धरणातील गाळ उपसण्‍याची मोहीम हाती घेतली आहे.

ग्रामस्‍थांनी हाती घेतली गाळ उपसण्‍याची मोहीम

उमटे धरण १९८० साली बांधण्‍यात आले आहे. या धरणाकडे रायगड जिल्‍हा परिषदेचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंत या धरणातील गाळ एकदाही उपसण्यात आला नाही. त्‍यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे परिसरातील तरूणांनी एकत्र येवून याबाबत जनजागृती केली आणि ग्रामस्‍थांना गाळ उपसण्‍याच्‍या कामासाठी प्रवृत्‍त केले. यानंतर आता शेकडो ग्रामस्‍थांचे हात गाळ उपसण्‍याच्‍या कामाला लागले आहेत.

यंत्रणेच्‍या दुर्लक्षेमुळे नागरिकांना दुषित पाणी प्‍यावे लागत आहे. तेथे जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभारावा, अशी नागरीकांची मागणी आहे. धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट असून पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने साठवण क्षमता साधारणतः २५ ते ३० दशलक्ष घनफूट कमी झाली आहे. त्यामुळे उमटे धरणासारखे विशाल धरण उशाला असून येथील ग्रामस्‍थांच्‍या घशाला कोरड आहे.

कोट्यवधीचा निधी खर्चुन बांधण्यात आलेले धरण ज्या क्षमतेने पाणी पुरवठ्यास उपयुक्त ठरावे त्याप्रमाणे उपयुक्त ठरत नाही. उमटे धरणातून साधारणतः दीड लाख लोकांची तहान भागवण्याची क्षमता आहे. मात्र, आजघडीला धरणालाच कोरड व भेगा पडल्‍याचे दिसून येत आहे. धरणात गुरांचे शेण, मलमुत्र व मानवी विष्‍ठा दिसून येते. तसेच मोठ्या प्रमाणावर शेवाळ व केरकचरा असल्याने सभोवतालच्या गावांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी दुषित पाण्यामुळे विविध आजार, रोगराई पसरत असून नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.

उमटे धरणाकडे दुर्लक्ष होत असून जिल्‍हा परीषदेच्‍या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार याला जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे. त्यामुळे गरज ओळखून लवकरात लवकर यांत्रिकी पध्दतीने गाळ उपसा करण्यात यावा. तसेच धरणाची पाणी साठवणक्षमता वाढवून ग्रामस्‍थांची तहान भागवावी, अशी मागणी आगरी समाज तसेच नवतरुण मंडळाने केली आहे.

Intro:
उमटे धरणातील गाळाकडे रायगड जिल्‍हा परीषदेचे दुर्लक्ष 

18 गावातील ग्रामस्‍थांनी हाती घेतली गाळ उपसण्‍याची मोहीम

रायगड : अलिबाग तालुक्‍यातील जवळपास 70 गावे आणि वाडयांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणाचा गाळ परीसरातील ग्रामस्‍थांनी एकत्र येवून उपसण्‍याची मोहीम हाती घेतली आहे. 1980 साली बांधण्‍यात आलेल्‍या या धरणाकडे रायगड जिल्‍हा परीषदेचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंत या धरणातील गाळ एकदाही उपसण्‍यात आला नव्‍हता त्‍यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. अखेर परीसरातील तरूणांनी एकत्र येवून याबाबत जनजागृती केली आणि ग्रामस्‍थांना गाळ उपसण्‍याच्‍या कामासाठी प्रवृत्‍त केले. शेकडो ग्रामस्‍थांचे हात आता गाळ उपसण्‍याच्‍या कामाला लागले आहेत.Body:यंत्रणेच्‍या दुर्लक्षामुळे नागरीकांना खराब पाणी प्‍यावे लागत आहे तेथे जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभारावा अशी नागरीकांची मागणी आहे. धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता 87दशलक्ष घनफूट असून पाण्याची शेवटची पातळी 40 मिटर,धरणाची उंची 56.40 मिटर, असून सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने साठवण क्षमता साधारणतः 25 ते30 दशलक्ष घनफूट कमी झाली आहे. त्यामुळे उमटे धरणासारखे विशाल धरण उशाला असून येथील ग्रामस्‍थांच्‍या घशाला कोरड आहे. 
Conclusion:कोट्यवधीचा निधी खर्चुन बांधण्यात आलेले धरण ज्या क्षमतेने पाणी पुरवठ्यास उपयुक्त ठरावे त्याप्रमाणे उपयुक्त ठरत नाही. उमटे धरणातून साधारणतः दीड लाख लोकांची तहान भागवण्याची क्षमता आहे. मात्र आजघडीला धरणालाच कोरड व भेगा पडल्‍याचे दिसून येत आहे. धरणात गुरांचे शेण मलमुत्र व मानवी विष्‍ठा दिसून येते. तसेच मोठ्या प्रमाणावर शेवाळ व केरकचरा मोठ्या प्रमाणावर असल्याने सभोवतालच्या गावांना दुषीत पाणीपुरवठा होत आहे. परिणामी दुषीत पाण्यामुळे विविध आजार, रोगराई पसरत असून नागरीकांचे जिवितास धोका निर्माण झाला आहे. उमटे धरणाकडे दुर्लक्ष होत असून जिल्‍हा परीषदेच्‍या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार याला जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे. गरज ओळखून लवकरात लवकर यांत्रीकी पध्दतीने गाळउपसा करण्यात यावा व धरणाची पाणी साठवणक्षमता वाढवून ग्रामस्‍थांची  तहान भागवावी, अशी मागणी आगरी समाज तसेच नवतरुण मंडळाने केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.