ETV Bharat / state

माणगाव मध्ये वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू, 6 वर्षाची मुलगी बचावली - raigad district rain

माणगाव तालुक्यात मंगळवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

माणगाव मध्ये वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Nov 6, 2019, 12:06 AM IST

रायगड - माणगाव तालुक्यातील विचवली येथे वीज अंगावर पडून दोन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ६ वर्षाची मुलगी बालबाल बचावली आहे. तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविंद्र सिताराम दिवेकर, (३०) रा. विचवली माणगाव आणि रिक्षाचालक असलेले मनोहर साबजी देसाई, (६९) हे दोघे वीज अंगावर पडून ठार झाले आहेत.

माणगाव तालुक्यात मंगळवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. रवींद्र दिवेकर हे आपल्या ६ वर्षाच्या मुलीसोबत ऍक्टिव्हावर विचवली येथे आले होते. येथे पावसामुळे ते एका झाडाखाली उभे राहिले. त्यावेळी दिवेकर बाप लेक उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळली. दिवेकर यांच्या मुलीच्या कानाला लागून वीज रवींद्र यांच्या अंगावर पडून ते जागीच ठार झाले. तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे.

मनोहर देसाई हे रिक्षाचालक भाडे सोडून माणगाव कडे येत असताना विचवली पासून १० मीटर अंतरावर आले असता वीज रिक्षावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचे प्राण गेले आहेत.

Intro:
माणगाव मध्ये वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

सहा वर्षाची मुलगी बचावली

रायगड : माणगाव तालुक्यातील विचवली येथे वीज अंगावर पडून दोन जण जागीच ठार झाले असून यामध्ये सहा वर्षाची मुलगी बालबाल बचावली आहे. तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविद्रं सिताराम दिवेकर, 30 रा. विचवली माणगाव, मनोहर साबजी देसाई, 69 रिक्षाचालक हे दोघे वीज अंगावर पडून ठार झाले आहेत.Body:माणगाव तालुक्यात सायंकाळ पासून विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. रवींद्र दिवेकर हे आपल्या सहा वर्षाच्या मुलीसोबत ऍक्टिव्हा वर विचवली येथे आले असता पाऊस लागल्याने एका झाडाखाली उभे राहिले. त्यावेळी दिवेकर बाप लेक उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळली. दिवेकर यांच्या मुलीच्या कानाला लागून वीज रवींद्र यांच्या अंगावर पडून ते जागीच ठार झाले तर कन्या ही जखमी झाली आहे.Conclusion:मनोहर देसाई हे रिक्षाचालक भाडे सोडून माणगाव कडे येत असताना विचवली पासून 10 मीटर अंतरावर आले असता वीज रिक्षावर पडून मनोहर देसाई यांचा जागीच मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचे प्राण गेले असून दिवेकर यांची मुलगी यातून वाचली असून तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.