रायगड- खालापूर, कर्जत भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरीयन नागरिकांसह स्थानिक नागरिकांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. हे स्थानिक आरोपी परदेशी नागरिाकांच्या मदतीने स्थानिक बाजारात छुप्या पद्धतीने आमली पदार्थाची तस्करी करत होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे स्वप्रिल येरुणकर यांना अंमली पदार्थाच्या तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत एक भारतीय आणि नायजेरीयन नागरिकाला ताब्यात घेतले. त्या इसमांच्या ताब्यातून १९ ग्रॅम 'मेफेड्रोन' आणि १५० ग्रॅम 'गांजा' हे अनुक्रमे व वजनाचे अंमली पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याची शक्यता
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन पुरुष आरोपींपैकी एक आरोपी हा कर्जत, जि. रायगड येथील रहिवाशी असून त्याच्यावर यापुर्वी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर दुसरा आरोपी हा नायजेरीन नागरीक असल्याने यामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी सहभागी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.