ETV Bharat / state

दुर्मीळ खवले मांजरांची तस्करी करणारे चौघे अटकेत - दुर्मिळ खवले मांजर

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात खबऱ्याकडून सुधागड नवघर येथे दोन व्यक्ती खवले मांजर विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती लागली होती. त्यानुसार संशयित असलेल्या मोटारस्वारांना थांबून त्यांची चौकशी केली. मोटार सायकलस्वार अनिल वाघमारे यांच्या पाठीवर असणारी बॅग तपासली असता खवले मांजर व त्याचे पिल्लू आढळून आले. या प्रकरणी खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. 2 खवले मांजर आणि 2 मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Trafficking of rare scaly cats
दुर्मिळ खवले मांजरांची तस्करी
author img

By

Published : May 7, 2021, 3:59 PM IST

रायगड - जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात वनविभागाने खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. तसेच 2 खवले मांजर आणि 2 मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी इतर काही जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडण्यात आलेल्या खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत आहे.

खवले मांजर

आणि तस्कर वन विभागाच्या जाळ्यात

वन विभागाला मिळालेल्या खबरीनुसार सुधागड नवघर येथे दोन व्यक्ती खवले मांजर विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनसंरक्षक संजय कदम आणि सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी नवघर येथे सापळा रचला होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अडुळसे ते जांभूपाडा रोडवर दोन संशयित मोटरसायकलवर आले. आणि वन विभागाच्या जाळ्यात फसले.

खवले मांजर, मोटार सायकलसह चौघे अटकेत

संशयित असलेले मोटारसायकलस्वारांना थांबवून त्यांची चौकशी केली. मोटार सायकलस्वार अनिल वाघमारे यांच्या पाठीवर असणारी बॅग तपासली असता खवले मांजर व त्याचे पिल्लू आढळून आले. या प्रकरणी गाडीवर असणारे दशरथ वालेकर (रा. झाप आदिवासीवाडी), हिरामण हिलम (रा. कुंभारशेत), अनिल वाघमारे (रा. पुणे), रमेश जाधव राहणार वांद्रे तालुका मुळशी या चौघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडील 2 मोटर सायकल व 2 खवले मांजर वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही खवले मांजर काही दिवस पोत्यात कैद असल्याने अशक्त झाले होते. त्यांच्यावर सुधागड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी उपचार केले.

हेही वाचा - सरकारी दरात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, गोर गरिबांचे वाचेल प्राण - नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.