ETV Bharat / state

सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे कार्यकर्ते आक्रमक - बाळासाहेब सातपुते

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचे पत्र म्‍हसळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला मिळाले आहे. यासंदर्भात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे म्‍हसळा तालुका अध्‍यक्ष समीर बनकर यांनी म्‍हसळा पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली आहे.

निनावी पत्र
author img

By

Published : Mar 22, 2019, 7:51 PM IST

रायगड - राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचे पत्र म्‍हसळ्यातील पक्षाच्या कार्यालयाला मिळाले आहे.

या पत्रात बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते या अहमदनगर जिल्‍ह्यातील वडगाव तांदळी येथे राहणाऱ्या व्‍यक्‍तीपासून तटकरे यांना धोका असल्‍याचे म्‍हटले आहे. ही व्‍यक्‍ती गुन्हेगारी प्रवृत्‍तीची आहे. तटकरेंना ठार मारण्‍यासाठी पूर्व वैमनस्‍यातून काही लोकांनी या व्‍यक्‍तीची मदत घेतली असल्‍याचेही या पत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

यासंदर्भात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे म्‍हसळा तालुका अध्‍यक्ष समीर बनकर यांनी म्‍हसळा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अदखलपात्र गुन्‍हा नोंदवला आहे. तर दुसरीकडे या व्‍यक्‍तीचा शोध घेण्‍यासाठी रायगड पोलिसांचे पथक नगरकडे रवाना झाले आहे. तटकरे यांना आलेल्या या धमकी पत्रामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

(सुनील तटकरे यांचा फोटो आपल्याकडील वापरावा)

स्‍लग – सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचं पत्र, राष्‍ट्रवादीच्‍या म्‍हसळा कार्यालयात आलं निनावी पत्र, म्‍हसळा पोलीस ठाण्‍यात तक्रार

अँकर – राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस आणि रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनील तटकरे यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचं पत्र म्‍हसळयातील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या कार्यालयाला प्राप्‍त झालंय. बाळासाहेब भाउसाहेब सातपुते या अहमदनगर जिल्‍हयातील वडगाव तांदळी इथं राहणाऱ्या व्‍यक्‍तीपासून तटकरे यांना धोका असल्‍याचं पत्रात म्‍हटल आहे. ही व्‍यक्‍ती गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीची असून आपल्‍याला ठार मारण्‍यासाठी पूर्व वैमनस्‍यातून काही लोकांनी या व्‍यक्‍तीची मदत घेतली असल्‍याचंदेखील या पत्रात नमूद करण्‍यात आलं आहे.
सुनील तटकरे यांच्‍या नावाने हे पत्र आलं असून म्‍हसळयाच्‍या पक्ष कार्यालयाच्‍या पत्‍त्‍यावर मिळालं आहे. यासंदर्भात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे म्‍हसळा तालुका अध्‍यक्ष समीर बनकर यांनी म्‍हसळा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली असून पोलीसांनी अदखलपात्र गुन्‍हा नोंदवला आहे. दरम्‍यान या व्‍यक्‍तीचा शोध घेण्‍यासाठी रायगड पोलीसांचे पथक नगरकडे रवाना झाले आहे.

सुनील तटकरे याना आलेल्या या धमकीपत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.