#इंधन दरवाढ : रायगडात शिवसेनेची केंद्र सरकारविरोधात निदर्शने - raigad diesel price shivsena agitation
केंद्र सरकारने इंधन दरवाढीबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पेट्रोलचे भाव शंभरीपर्यंत जाऊ लागले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.

रायगड - भाजपने राज्यात वीज दरवाढ विरोधात आंदोलन केली असताना दुसरीकडे शिवसेनेने इंधन दरवाढी विरोधात मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. जिल्ह्यात अलिबाग, कर्जत, खालापूर, माणगाव, महाड याठिकाणी शिवसैनिकांनी मोर्चा काढून निदर्शने केली. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार महेंद्र दळवी याच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी निधी चौधरी याना इंधन दरवाढीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक -
केंद्र सरकारने इंधन दरवाढीबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पेट्रोलचे भाव शंभरीपर्यंत जाऊ लागले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. याबाबत शिवसेनेने राज्यभर केंद्राच्या इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करून मोर्चे काढले आहेत.
हेही वाचा - पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात जिल्ह्यात शिवसेनेचे आंदोलन
अलिबागसह जिल्ह्यात शिवसैनिकांची निदर्शने -
इंधन दरवाढ विरोधात आज जिल्ह्यातही शिवसैनिकानी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे. महाड, माणगाव, कर्जत, खालापूर याठिकाणी निदर्शने करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले. अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी याच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीबाबत घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख राजा केणी शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते.