रायगड- जिल्ह्यातील १५ तालुका पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे पुढील काळासाठीचे आरक्षण मंगळवारी (१० डिसेंबर) जाहीर झाले. सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोडतीचे आयोजन झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मयुरा महाडिक या चिमुरडीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
सोडतीनुसार मुरूड, पेण, पनवेल, तळा, महाड, पोलादपूर आणि म्हसळा या ७ पंचायत समित्यांच्या सभापतीपदी महिलांना संधी मिळणार आहे. यातील १ पद (पनवेल) अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असेल. या व्यतिरिक्त माणगाव येथे अनुसूचित जाती व रोहा येथे अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक जागा राखीव असणार आहे. मंगळवारी झालेल्या सोडतीनुसार आजच्या उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी म्हस्के पाटील, प्रवीण वरंडे उपस्थित होते. या सोडतीकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही यावेळी गर्दी केली होती.
तालुकावार सभापतीपदांचे आरक्षण
1) अलिबाग (सर्वसाधारण), 2) मुरूड (मागास प्रवर्ग महिला), 3) पेण (मागास प्रवर्ग महिला), 4) पनवेल (अनुसूचित जमाती महिला), 5) उरण (सर्वसाधारण), 6) कर्जत – (सर्वसाधारण), 7) खालापूर (मागास प्रवर्ग), 8) रोहा (अनुसूचित जमाती), 9) सुधागड (सर्वसाधारण), 10) माणगाव (अनुसूचित जमाती), 11) तळा (सर्वसाधारण महिला), 12) महाड (सर्वसाधारण महिला), 13) पोलादपूर (सर्वसाधारण महिला), 14) श्रीवर्धन (नागरीकांचा मागास प्रवर्ग), 15) म्हसळा (सर्वसाधारण महिला).
हेही वाचा- पनवेलमध्ये 'फ्लाईंग कार'; शोरूमच्या पहिल्या मजल्यावरुन चारचाकी थेट जमिनीवर