ETV Bharat / state

रायगडातील लोकसभा प्रचाराच्‍या तोफा थंडावल्‍या; अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरेंमध्ये मुख्‍य लढत

लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्‍या तोफा आज थंडावल्‍या आहेत. मागील २० दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली आहे. येथील मुख्य लढत ही शिवसेनेचे अंनत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात रंगणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे मुख्य उमेदवार अंनत गिते आणि सुनिल तटकरे
author img

By

Published : Apr 21, 2019, 11:10 PM IST

रायगड - लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्‍या तोफा आज थंडावल्‍या आहेत. मागील २० दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली असून यावेळी रायगड लोकसभेसाठी १६ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्‍य लढत शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्‍यात होणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे मुख्य उमेदवार अंनत गिते आणि सुनिल तटकरे

विद्यमान खासदार अनंत गीतेंना पुन्‍हा निवडून आणण्‍यासाठी शिवसेना, भाजपने कंबर कसली आहे तर सुनील तटकरेंच्‍या विजयासाठी आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्‍यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेस आणि शेकापचे कार्यकर्तेही प्रचार करताना दिसून आले.

वंचित बहुजन आघाडीच्‍या सुमन कोळी, बसपाचे मिलिंद साळवी हे देखील निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. अनंत गीते यांच्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते आदेश बांदेकर, नीलम गोऱ्हे यांनी सभा घेतल्‍या तर सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार, अमोल कोल्‍हे, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडेंनी हजेरी लावली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्‍या सुमन कोळींसाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली होती. 2014 मध्‍ये झालेल्‍या तिरंगी लढतीत शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेंवर २१०० मतांनी निसटता विजय मिळवला होता.

यावेळच्‍या प्रचारातही नेहमीप्रमाणे आरोप प्रत्‍यारोपांच्‍या जोरदार फैरी झडल्‍या. थेट प्रचार संपल्‍यानंतर आता उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी प्रत्‍यक्ष मतदारांच्‍या गाठीभेटीवर भर दिला आहे. त्‍यामुळे सोमवारचा दिवस हा छुप्‍या प्रचाराचा असणार आहे. या मतदारसंघात २ हजार १७९ मतदान केंद्रे असून १६ लाख ५१ हजार ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात पुरुष मतदार ८ लाख ९ हजार ३४४ आणि महिला मतदार ८ लाख ४२ हजार २१३ आहेत.

Intro:

 रायगडातील प्रचाराच्‍या तोफा थंडावल्‍या 

अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे यांच्‍यात मुख्‍य लढत

रायगड : रायगड लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्‍या तोफा आज थंडावल्‍या. गेले 20 दिवस सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी संपली. यावेळी 16 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्‍य लढत शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांच्‍यात होणार आहे.

अनंत गीते यांना पुन्‍हा निवडून आणण्‍यासाठी शिवसेना, भाजपाने कंबर कसली आहे तर सुनील तटकरे यांच्‍या विजयासाठी आणि मागील पराभवाचा वचपा काढण्‍यासाठी राष्‍ट्रवादी बरोबरच कॉंग्रेस व शेकापचे कार्यकर्तेही मेहनत घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्‍या सुमन कोळी, बसपाचे मिलींद साळवी हे देखील निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत. अनंत गीते यांच्‍यासाठी उदधव ठाकरे, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते आदेश बांदेकर , नीलम गोऱ्हे  यांनी सभा घेतल्‍या तर तटकरे यांच्‍यासाठी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार, अमोल कोल्‍हे, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंढे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला. वंचित बहुजन आघाडीच्‍या सुमन कोळी यांच्‍यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली.Body:यावेळच्‍या प्रचारातही नेहमीप्रमाणे आरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी झडल्‍या. थेट प्रचार संपल्‍यानंतर आता उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी प्रत्‍यक्ष मतदारांच्‍या गाठीभेटीवर भर दिला आहे. त्‍यामुळे सोमवारचा दिवस हा छुप्‍या प्रचाराचा राहणार आहे.

या मतदार संघात 2 हजार 179 मतदान केंद्र असून 16 लाख 51 हजार 560 मतदार आपला मतदानाचा हकक बजावतील. यामध्ये पुरुष मतदार 8 लाख 9 हजार 344 आणि महिला मतदार  8 लाख 42 हजार 213 आहेत.

................................................................................

मागील वेळी म्‍हणजे 2014 मध्‍ये झालेल्‍या तिरंगी लढतीत शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांच्‍यावर 2100 मतांनी निसटता विजय मिळवला होता. 1952 पासून आतापर्यंत झालेल्‍या 16 निवडणूकांमध्‍ये कॉंग्रेसचे सर्वाधिक 8 खासदार झाले, शेकापचे 6 खासदार झाले तर शिवसेनेने 2 वेळा विजय मिळवला. कॉंग्रेसचे सी. डी. देशमुख हे पहिले खासदार ठरले .Conclusion:रायगड जिल्‍हयातील लोकसभा निवडणूकीसाठी माहिती

१७३८ मतदान केंद्रे 

मतदारसंघात एकूण २१७९ मतदान केंद्रे आहेत. १ हजार ९९६ ग्रामीण भागात तर १८३ शहरी भागात आहेत. (मतदारसंघनिहाय:  पेण ३७५, अलिबाग - ३७७, श्रीवर्धन - ३५१,महाड - ३९२, दापोली - ३६३, गुहागर ३२१ ) 

१४०५ सर्व्हिस व्होटर्स 

३२ रायगड जिल्ह्यात एकूण १४०५ सर्व्हिस व्होटर्स आहेत. (मतदारसंघनिहाय:  पेण १७९, अलिबाग १६०, श्रीवर्धन ६७, महाड ४८८, दापोली २६३, गुहागर २४८ )

सखी मतदान केंद्रे ७ 

मतदार संघात  ७ सखी मतदान केंद्रे असतील.  पेण नगरपालिका, अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे नगर -१ आणि सरखेल कान्होजी आंग्रे नगर -२, श्रीवर्धनमधील उतेखोल ४, महाड येथील  कांबळे तर्फे महाड, दापोली येथील गिम्‍हवणे , आणि गुहागर मधील गुहागर ही ती केंद्रे असतील. 

दिव्यांग संचलित मतदान केंद्र 

अलिबागमधील सेंट मेरी हायस्कूल येथील मतदान केंद्र पूर्णत: दिव्यांग संचलित मतदान केंद्र असून याठिकाणी पोलिस वगळता ५ ही अधिकारी व कर्मचारी दिव्यांग आहेत.

एकूण १६ लाख ५१ हजार ५६० मतदार

या मतदारसंघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार आहेत. यामध्ये पुरुष ८ लाख ९ हजार ३४४ आणि महिला ८ लाख ४२ हजार २१३ आहेत. (विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्‍या .......   पेण - ३ लाख ७६ हजार , अलिबाग - २ लाख ९२ हजार ४२१,श्रीवर्धन - २ लाख ५६ हजार १८०, महाड - २ लाख ८४ हजार २३०, दापोली - २ लाख ७९ हजार २३८, गुहागर २ लाख ३९ हजार ४१५ )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.