ETV Bharat / state

तारिक गार्डन दुर्घटना : बिल्डर आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

author img

By

Published : Aug 25, 2020, 4:06 AM IST

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

Raigad building collapse builder booked
तारिक गार्डन दुर्घटना : बिल्डर आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

महाड (रायगड) : महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या इमारतीच्या बिल्डरवर आणि दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच, या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, आणि जखमींना योग्य ती शासकीय मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इमारत बांधणाऱ्या बिल्डरने केवळ एका वर्षात ही इमारत उभी केली आहे. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असून इमारतीचे कामही तकलादू केल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असे आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते. त्यानंतर या बिल्डरवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कुटुंबासाठी नुकसानभरपाई वसूल करावी अशी मागणी या इमारतीत राहणारे लोक करत होते.

दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही २६ लोक अडकले असून, त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि श्वानपथक युद्धपातळीवर काम करत असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.