ETV Bharat / state

जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांनी लसीचे 2 डोस किंवा आरटीपीसीआर करावी - तटकरे - Raigad ganesh festival

येणाऱ्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस किंवा 72 तास आधी आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी करून यावे जेणेकरून आपल्याच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आपण घेऊ शकता, असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चाकरमानी गणेशभक्तांना केले आहे.

आदिती तटकरे
आदिती तटकरे
author img

By

Published : Sep 1, 2021, 8:49 PM IST

Updated : Sep 1, 2021, 8:57 PM IST

रायगड - 10 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. रायगडात गणेशोत्सव सण हा उत्साहात साजरा होत असतो. हा सण साजरा करण्यासाठी चाकरमानी हे आपल्या गावी येत असतात. मात्र यावर्षीही कोरोनाचे संकट अद्यापही आहे. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस किंवा 72 तास आधी आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी करून यावे जेणेकरून आपल्याच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आपण घेऊ शकता, असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चाकरमानी गणेशभक्तांना केले आहे. तसेच याबाबत सक्ती नसून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेत असलेली काळजी असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक

गणेशोत्सव 2021 पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केले. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.

'...तर लाटेपासून वाचू शकतो'

रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त सध्या कोणतेही निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून लावलेले नाहीत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभावना वर्तवली आहे. त्यामुळे पुढील संभाव्य धोका ओळखून काही उपाययोजना केल्यास तिसऱ्या लाटेपासून आपण वाचू शकतो. यासाठी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानी भक्तांनी लसीचे दोन डोस घ्यावेत अन्यथा आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी करून यावे. यासाठी कोणतीही सक्ती केलेली नसली तरी स्वतःच्या आणि गावाकडील कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. यासाठी हे आवाहन करीत असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Last Updated : Sep 1, 2021, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.