दुबई 900 Sixes in T20 Cricket : वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू किरॉन पोलार्ड त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. विशेषतः T20 क्रिकेटमध्ये, तो कोणत्याही संघासाठी पहिली पसंती राहतो. पोलार्ड जगभरात खेळल्या जाणाऱ्या T20 लीगमध्ये खेळतो आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. दरम्यान, किरॉन पोलार्डनं आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. पोलार्डनं एक मोठी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज ठरला.
Kieron Pollard completes 900 sixes in T20 cricket. 🤯 pic.twitter.com/3RIC4TF2P6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 16, 2025
पोलार्डनं केली उत्तम कामगिरी : सध्या युएईत ILT20 चं आयोजन केलं जातंय. यात किरॉन पोलार्ड एमआय एमिरेट्स संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत गुरुवारी एमआय एमिरेट्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पोलार्डनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यात पोलार्डनं 23 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्यानं त्याच्या खेळीदरम्यान दोन चौकार आणि तीन षटकार मारले. यासह, त्यानं T20 क्रिकेटमध्ये 900 षटकार पूर्ण केले आहेत. यासह तो T20 क्रिकेटमध्ये 900 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. याआधी फक्त ख्रिस गेलनं 900+ षटकार मारले आहेत.
Kieron Pollard becomes just the second batter in T20 history, after Chris Gayle, to smash 900+ sixes. 💥
— All Cricket Records (@Cric_records45) January 17, 2025
1,056 : Chris Gayle (455 innings)
901* : Kieron Pollard (614 innings)
727 : Andre Russell (456 innings)
593 : Nicholas Pooran (351 innings)
550 : Colin Munro (415 innings) pic.twitter.com/ijJgKLp90h
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे जगातील टॉप 5 फलंदाज :
- ख्रिस गेल : 1056 षटकार
- किरॉन पोलार्ड : 901* षटकार
- आंद्रे रसेल : 727* षटकार
- निकोलस पूरन : 592* षटकार
- कॉलिन मुनरो : 550* षटकार
" 💥 900 sixes for the 'pollardator'! 💥 kieron pollard joins an elite club with an incredible milestone. one of the most explosive batters in t20 history. pic.twitter.com/4l7mTPdZ5w
— The sports (@the_sports_x) January 17, 2025
पोलार्डची T20 कारकीर्द कशी : किरॉन पोलार्डनं 2006 मध्ये त्याच्या T20 कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं त्याच्या कारकिर्दीत एकूण 690 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 31.23 च्या सरासरीनं आणि 150.38 च्या स्ट्राईक रेटनं 13429 धावा केल्या आहेत. पोलार्डची कारकीर्द अद्भुत राहिली आहे. या काळात त्यानं दोनदा T20 विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय, त्यानं अनेक T20 स्पर्धांमध्ये स्वतःच्या बळावर आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आहे. पोलार्डनं T20 क्रिकेटमध्ये एक शतक आणि 60 अर्धशतकं झळकावली आहेत.
हेही वाचा :