मुलतान Playing 11 Announced : पाकिस्तान क्रिकेट संघ आज 17 जानेवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना घरच्या मैदानावर खेळणार आहे. दोन्ही संघांमधील या कसोटी मालिकेतील सामने मुलतानमधील स्टेडियमवर खेळवले जातील. अशातच पाकिस्तान संघानं पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे, ज्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या 22 वर्षीय फलंदाज मोहम्मद हुरैराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
Pakistan chisel out finishing touches ahead of the home Test series against the West Indies 🏏#PAKvWI #WTC25 pic.twitter.com/AI7mzeJHFE
— ICC (@ICC) January 16, 2025
प्लेइंग 11 मध्ये चार फिरकीपटूंना स्थान : मुलतान स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघानं त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये चार फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे, तर फक्त एक वेगवान गोलंदाज खुर्रम शहजादला स्थान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाकिस्तानी संघाचा भाग नसलेले फिरकीपटू अबरार अहमद आणि साजिद खान हे अंतिम 11 मध्ये परतले आहेत. जर आपण मोहम्मद हुरैराबद्दल बोललो तर तो कर्णधार शान मसूदसोबत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी घेईल.
संघ म्हणून कसोटी मालिकेसाठी सज्ज : तत्पुर्वी पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानी संघाचा कर्णधार शान मसूद म्हणाला की, वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. वेस्ट इंडिज संघाची खेळण्याची शैली खूपच वेगळी आहे आणि त्यामुळं आपल्याला आव्हानांना तोंड द्यावं लागेल. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही अशा आव्हानांना कसं सामोरं जाता यावर बरंच काही अवलंबून आहे. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेतील विजयामुळं आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे आणि आम्ही या मालिकेतही हीच गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करु.
Pakistan's playing XI for the first Test 🇵🇰
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 16, 2025
Mohammad Huraira to make his debut tomorrow 🙌#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/MkpKaEsdsm
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग 11 :
शान मसूद (कर्णधार), मुहम्मद हुरैरा, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, साजिद खान, नौमान अली, अबरार अहमद, खुर्रम शहजाद.
हेही वाचा :