मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीची 'वादग्रस्त क्वीन' कंगना राणौत सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर, हा चित्रपट अखेर आज, 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. मात्र पंजाबमध्ये या चित्रपटाचा पहिला शो रद्द करण्यात आला आहे. दिवसभरात आणखी शो होऊ शकतील का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला पंजाबमध्ये बऱ्याच काळापासून विरोध होत आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांवर शिखांची प्रतिमा खराब केल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे.
कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर पंजाबमध्ये बंदी : 'इमर्जन्सी' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला नाही पाहिजे, यासाठी अनेक प्रयत्न केल्या गेले. अलीकडेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांना या चित्रपटाबाबतीत एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित झाला तर शीख समुदायात राग आणि असंतोष निर्माण होईल आणि म्हणूनच, राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची जबाबदारी सरकारची आहे.' कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीनंतर पंजाबमधील अमृतसरमधील पीव्हीआर सिनेमागृहाबाहेर मोठ्या संख्येनं पोलिसांना तैनात केले गेले आहेत.
#WATCH | Punjab | Security heightened outside a cinema hall in Amritsar, ahead of the screening of actress Kangana Ranaut's 'Emergency'
— ANI (@ANI) January 17, 2025
SGPC has urged the Punjab Government to impose a ban forthwith on the movie ‘Emergency’ in all the cinema halls in the state of Punjab. pic.twitter.com/c6pHoBrqzk
काळे झेंडे दाखवून 'इमर्जन्सी'चा निषेध : कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी यावी यासाठी पंजाबमधील विविध चित्रपटगृहाबाहेर काळे झेंडे घेऊन अनेकजण आपला निषेध व्यक्त करत आहेत. कंगनाच्या चित्रपटाविरुद्ध विविध ठिकणी पंजाबमध्ये घोषणाबाजी केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी एसजीपीसीचे मुख्य सचिव कुलवंत सिंग मन्नन यांनी म्हटलं, "अभिनेत्री कंगना राणौत सुरुवातीपासूनच पंजाबविरुद्ध बोलत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी यासाठी आदल्या दिवशी आम्ही अमृतसरच्या उपायुक्तांना भेटलो होतो. यानंतर गृह मंत्रालयाशीही याबद्दल बोलन झालं होतं, मात्र तरीही चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पंजाबमध्ये कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाही." यापूर्वी कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बांग्लादेशमध्ये देखील बंदी घातली गेली आहे.
हेही वाचा :