ETV Bharat / state

"हा आका काहीही करू शकतो...", सुरेश धस यांचा नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा - AMERICAN MOBILE SIM CARDS

अमेरिकन सिम कार्डवरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी टीकास्त्र डागलं असून, "हा सोपा आका नाही, हा आका 17 मोबाईल वापरायचा", असा टोलाही वाल्मिक कराडला लगावलाय.

Suresh Dhas targeted to Valmik Karad
सुरेश धस यांचा नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 6:50 PM IST

मुंबई- बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर वाल्मिक कराडला जामीन मिळू नये, असं एसआयटीनं म्हटलंय. दरम्यान, वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याने अनेकांना धमकावल्याचंही समोर आलंय. वाल्मिक कराडकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 17 मोबाईल आणि याचबरोबर कराडकडे अमेरिकन सिम कार्ड होते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. या अमेरिकन सिम कार्डवरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी टीकास्त्र डागलं असून, "हा सोपा आका नाही, हा आका 17 मोबाईल वापरायचा", असा टोलाही वाल्मिक कराडला लगावलाय.

आका ठराविक लोकांना पैसे पाठवायचा : पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, हा आका आता अमेरिकन सिम कार्ड वापरत होता, अशी माहिती समोर येतेय. तो काय करू शकत नाही, आका सगळं काही करू शकतो. आकाचा बाका आणि हा आका 50-50 लोकांना काही ठराविक लोकांना रक्कम पाठवत असे. मी ठराविक लोकांना म्हणतोय, ते ठराविक लोकं कोण आहेत, ते तुमचं तुम्ही समजून जा, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर टीका केलीय.

सिम कार्डवरून धमकी : वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुख्य सूत्रधार असल्याचे पुराव्यावरून एसआयटीने म्हटलंय. तसेच वाल्मिक कराडकडे वेगवेगळ्या कंपनीचे 17 मोबाईल होते, तो अमेरिकन सिम कार्ड वापरत असे. या सिम कार्डवरून तो खंडणी आणि पैशासाठी लोकांना धमकावत असल्याचीही माहिती समोर आलीय. दरम्यान, दुसरीकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा आणि संतोष देशमुख कुटुंबाला न्याय द्या, यासाठी या प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांनी हा खटला चालवावा. निकम यांची नेमणूक करण्यात यावी, याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केल्याचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

हेही वाचा :

  1. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता पण. .: अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
  2. गुजरातचं ड्रग्ज कनेक्शन परळीत, सुरेश धस यांचा जनआक्रोश मोर्चात सनसनाटी आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.