ETV Bharat / state

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पेणमधील पूरग्रस्त गावांची केली पाहणी; सैन्य दलाची तुकडी तैनात

नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा व शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत कृषी विभागाला सांगून ते सुद्धा पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करून घेण्याचे आदेश दिले आहेत. खारबंदिस्तीबाबत खारलँड अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन लवकरच याबाबत निधीची पूर्तता करून काम सुरू केले जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

रायगड
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:42 AM IST

रायगड - पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, बोर्जे, वाशी, वढाव या गावातील खार बंदिस्तीची कामे लवकरच करून येथील ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करणार असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले असल्याची माहिती पत्रकारांना पाहणी दौऱयादरम्यान दिली. पेण तालुक्यातील कणे, बोर्जे, वाशी, अंतोरे, वढाव या पूरग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. सैन्य दलाचे मेजर हिमांशू सलूजा, प्रांताधिकारी पूनम पुदलवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव, महसुलचे अधिकारी, तलाठी यावेळी उपस्थित होते.

रायगड जिल्हाधिकाऱयांनी पेणमधील पूरग्रस्त गावांची केली पाहणी

पेण तालुक्यात देशातील सर्वाधिक 493 मिमी पाऊस पडून रेकॉर्ड झाला आहे. यामुळे तालुक्याची परिस्थिती पुरमय झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कणे, अंतोरे, बार्जे, वाशी, वढाव या गावांना बसला. ही गावे नदीच्या व खाडीच्या मधोमध असल्याने व खारबंदिस्ती तुटली असल्याने पावसाचे पाणी, खाडीच्या भरतीचे व भोगावती नदीचे पाणी हे या गावात घुसले.

पाणी गावात घुसल्याने सारी गावे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे कणे, अंतोरे या गावातील ग्रामस्थ अडकून बसले होते. जिल्हा प्रशासनाने वेळीच पावले उचलून एनडीआरएफ व कोस्टल गार्ड यांना पाचारण करून कणे गावातील 65 जणांना सुखरूप स्थळी हलविले. अंतोरे गावातील 40 ते 50 जणांना कुंडलिका रिव्हर क्राफ्टच्या रेस्क्यू टीमने सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. या पुरामुळे या गावातील नागरिकांच्या घरातील सामानासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पाणी हे घरासमोर साचलेले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी गावातील खारबंदिस्ती तुटून खांड पडलेली आहे. त्यामुळे गावांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. 19 किलोमीटर गावाच्या हद्दीतील खारबंदिस्ती मजबूत करा, नुकसानीचे पंचनामे लवकर करा, खारलॅन्ड वनविभागाकडे न देता ग्रामपंचायतीच्या ताब्यातच ठेवा, अशी मागणी ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा व शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत कृषी विभागाला सांगून ते सुद्धा पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करून घेण्याचे आदेश दिले आहेत. खारबंदिस्तीबाबत खारलँड अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन लवकरच याबाबत निधीची पूर्तता करून काम सुरू केले जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सैन्य दलाला केले पाचारण

हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला होता. एनडीआरएफ व कोस्टल गार्ड ही पथके जिल्ह्यात आहेत. मात्र तरीही पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने मेजर हिमांशू सलूजा यांच्या देखरेखीखाली सैन्य दलाची 50 जणांची तुकडी बोलावण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

Intro:
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पेण मधील पूरग्रस्त गावांची केली पाहणी

सुरक्षेच्या दृष्टीने सैन्य दलाची एक तुकडी पेण मध्ये तैनात

कणे, अंतोरे, वाशी, बोर्जे, वढाव या गावांची केली पाहणी

रायगड : पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, बोर्जे, वाशी, वढाव या गावातील खारबंदिस्तीची कामे लवकरच करून येथील ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करणार असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले असल्याची माहिती पत्रकारांना पाहणी दरम्यान दिली. Body:पेण तालुक्यातील कणे, बोर्जे, वाशी, अंतोरे, वढाव या पूरग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केली. सैन्य दलाचे मेजर हिमांशू सलूजा, प्रांताधिकारी पूनम पुदलवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव, महसुलचे अधिकारी, तलाठी यावेळी उपस्थित होते.

पेण तालुक्यात देशातील सर्वाधिक 493 मिमी पाऊस पडून रेकॉर्ड झाला असला तरी यामुळे तालुक्याची परिस्थिती पुरमय झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कणे, अंतोरे, बार्जे, वाशी, वढाव या गावांना बसला. ही गावे नदीच्या व खाडीच्या मधोमध असल्याने व खारबंदिस्ती तुटली असल्याने पावसाचे पाणी, खाडीच्या भरतीचे व भोगावती नदीचे पाणी हे या गावात घुसले.

पाणी गावात घुसल्याने सारी गावे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे कणे, अंतोरे या गावातील ग्रामस्थ अडकून बसले होते. जिल्हा प्रशासनाने वेळीच पावले उचलून एनडीआरएफ व कोस्टल गार्ड यांना पाचारण करून कणे गावातील 65 जणांना सुखरूप स्थळी हलविले. तर अंतोरे गावातील 40 ते 50 जणांना कुंडलिका रिव्हर क्राफ्टच्या रेस्क्यू टीमने सुखरुओ बाहेर काढून सुरक्षस्थळी हलविले. या पुरामुळे या गावातील नागरिकांचे घरातील समानसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अजूनही पाणी हे घरासमोर साचलेले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज या गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थानी गावातील खारबंदिस्ती तुटून खांड पडलेली आहे. त्यामुळे गावांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. 19 किलोमीटर गावाच्या हद्दीतील खार बंदिस्ती मजबूत करा, नुकसानीचे पंचनामे लवकर करा, खारलॅन्ड वनविभागाकडे न देता ग्रामपंचायतीच्या ताब्यातच ठेवा अशी मागणी ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. Conclusion:नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा व शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत कृषी विभागाला सांगून ते सुद्धा पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करून घेण्याचे आदेश दिले आहेत. खार बंदिस्ती बाबत खारलँड अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन लवकरच याबाबत निधीची पूर्तता करून काम सुरू केले जाईल.

डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड

----------------------------
सैन्य दलाला केले पाचारण

हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला होता. एनडीआरएफ व कोस्टल गार्ड ही पथके जिल्ह्यात आहेत. मात्र तरीही पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने मेजर हिमांशू सलूजा यांच्या देखरेखीखाली सैन्य दलाची 50 जणांची तुकडी बोलावण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.