ETV Bharat / state

पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदीपार गेल्याने रायगडकरांचे कोलमडले बजेट

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने भाज्यांचे भावही आता वाढले जाणार आहेत. केंद्र सरकारने वाढलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत पावले उचलून ही दरवाढ कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

रायगड पेट्रोल डिझेल
रायगड पेट्रोल डिझेल
author img

By

Published : May 28, 2021, 3:55 PM IST

Updated : May 28, 2021, 4:16 PM IST

रायगड - कोरोना संकट त्यात लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता पेट्रोलने शंभरी गाठली असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणीचे स्वयंपाक घरातील बजेटही कोसळले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने भाज्यांचे भावही आता वाढले जाणार आहेत. केंद्र सरकारने वाढलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत पावले उचलून ही दरवाढ कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

रायगड पेट्रोल डिझेल
रायगड पेट्रोल डिझेल

'वाहने चालवायचे की चालत फिरायचे?'

अलिबागेत पेट्रोल 100.05 पैसे तर डिझेल 90.54 पेट्रोल हे शंभरी गाठणार, अशी आशा निर्माण झाली होती. बंगाल निवडणुका असल्याने पेट्रोल हे 97.66 रुपयांपर्यंत काही काळ स्थिर राहिले होते. मात्र निकालानंतर पेट्रोल दर शंभरीकडे जाऊ लागला होता. अखेर आज जिल्ह्यात पेट्रोल शंभरी पार झाले आहे. अलिबागेत आजचा पेट्रोल भाव हा 100.05 रुपये तर डिझेल 90.54 रुपये झाला आहे. त्यामुळे वाहने चालवायचे की चालत फिरायचे असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

रायगड पेट्रोल डिझेल
रायगड पेट्रोल डिझेल

सर्वसामान्यांना बसतोय फटका

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका हा सर्वाधिक सर्वसामान्य नागरिकांना जास्त बसतो. कोरोना संकट गेल्यावर्षीपासून डोक्यावर बसलेले आहे. त्यातच संचारबंदी लागू आहे. काम धंदा बंद आहे. हातात पैसे नाहीत. त्यातच वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका पडत आहे. इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचेही दर वाढले जाणार त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे दर आपोआप वाढणार. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील बजेट कोसळणार आहे. आधीच कोरोनाने आर्थिक संकट असल्याने आता इंधन दरवाढ ही नागरिकांना आर्थिक संकटाच्या गर्तेत ढकलणारी ठरणार आहे.

'केंद्र आणि राज्य सरकारने यावर उपाय काढावा'

शंभरी गाठलेल्या पेट्रोलमुळे सर्वांनाच फटका बसणार आहे. महागाईच्या गर्तेत लोटणाऱ्या जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र या महागाई बाबत सरकार हातावर हात धरून बसले असल्याने नागरिकांमध्ये या दरवाढीमुळे संताप व्यक्त होत आहे.

Last Updated : May 28, 2021, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.