ETV Bharat / state

माडप येथील खाणकाम बंद करण्यासाठी प्रशांत पाटील यांचे उपोषण सुरू - News about illegal mining

रायगड जिल्हातील माडप येथील अवैध खानकाम बंद करावे यासाठी माडप गावचे प्रशांत पाटील यांचे उपोषण सुरू आहे. ग्रामस्थानि अवैध खाण काम बंद करून आता पर्यंत झालेल्या कामाची रॉयल्टी वसूल करावी अशी मागणी केली आहे

prashant-patil-fasting-to-stop-mining-at-madap
माडप येथील खाणकाम बंद करण्यासाठी प्रशांत पाटील यांचे उपोषण सुरू
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:36 PM IST

रायगड - शासकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यावर कायद्याला बगल देऊन एखादे अवैध काम राजरोसपणे केले जाते आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो. खाण मधील स्फोटाने अशी परिस्थिती खालापूर तालुक्यातील मौजे माडप ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे. मौजे माडप ग्रामस्थांच्या या त्रासासाठी प्रशांत पाटील हा तरुण गेले आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण करत आहे. मात्र शासकीय प्रशासनाला याबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून आलेले आहे. प्रशांत पाटील हा सध्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. डोंगरात अवैधपणे सुरू असलेली खाण बंद करण्याची मागणी प्रशांत पाटील आणि ग्रामस्थांनी केलेली आहे.

माडप येथील खाणकाम बंद करण्यासाठी प्रशांत पाटील यांचे उपोषण सुरू

खालापूर तालुक्यातील माडप हे गाव मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला लागून आहे. माडप गावातील डोंगरातुन रेल्वेचा बोगदा जात असून त्याठिकाणी दगड खाणही आहे. याच डोंगरात आदीवासी वाडीही आहे. डोंगरातील दगड खाणीचा ठेका हा शासकीय महसूल यंत्रणेने अवैधपणे प्रभाकर पाटील यांना दिलेला आहे. दगड खणीपासून 200 मीटर अंतर असलेल्या ठिकाणी कायदेशीररित्यास्फोट करता येत नाही. मात्र, असे असताना ठेकेदार स्फोट घडवत आहे. डोंगर खाणी पासून 200 मीटरच्या आत आदिवासींची जुनी लोकवस्ती आहे. दगड खाणीत होत असलेल्या स्फोटाने आदिवासी वाडीवरील आदिवासीच्या घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दगड खाणीमुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या स्फोटाने रेल्वेच्या बोगद्यालाही धोका असल्याचे प्रशांत पाटील यांचे म्हणणे आहे.

1987 साली ठेकेदाराला परवानगी नाकारली होती. 2013 ला शासनाने खाणपट्टा रद्द केला होता. मात्र, तरीही महसूल अधिकाऱ्यांनी अवैधपणे दगड खाणीला परवानगी दिली आहे. 2017 ला माडप बोगद्याला स्फोटामुळे तडे जाण्याची शक्यता आहे. असा अहवाल रायगड जिल्हाधिकाऱ्यानी दिला होता. मात्र, तरीही खाणकाम सुरू असून येथील ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. माडप गावासह आजूबाजूच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली.

माडप येथील रहिवासी प्रशांत पाटील हे 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोनदा येऊन त्यांची भेट घेतली असून योग्य असे उत्तर मिळाले नसल्याने पाटील यांनी अद्याप उपोषण सोडलेले नाही. प्रशांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले आहे. खाण काम त्वरित बंद करून अवैधपणे केलेल्या उत्खननाची रॉयल्टी ठेकेदाराकडून वसूल करावी अशी मागणी प्रशांत पाटील यांनी केलेली आहे. न्याय मिळेपर्यत उपोषण सुरू राहील असा पवित्रा पाटील यांनी घेतला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता हा विषय कौटुंबिक असल्याचे बोलून त्यांनी वेळ मारून नेली आहे. त्यामुळे माडप ग्रामस्थांना न्याय मिळेल की नाही असा संशय निर्माण झाला आहे.

Intro:

स्फोटाने घराला गेले तडे तर माडप बोगदाही धोक्यात

प्रशासनाकडून दखल नाही, तब्येत बिघडल्याने पाटील रुग्णालयात

जिल्हाधिकारी साहेब आम्हाला न्याय द्या, ग्रामस्थांची मागणी

रायगड : शासकीय अधिकारी यांचा वरदहस्त असल्यावर कायद्याला बगल देऊन एखादे अवैध काम राजरोस पणे केले जाते आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो. खाण मधील स्फोटाने अशी परिस्थिती खालापूर तालुक्यातील मौजे माडप ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे. मौजे माडप ग्रामस्थांच्या या त्रासासाठी प्रशांत पाटील हा तरुण गेले आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण करीत आहे. मात्र शासकीय प्रशासनाला याबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून आलेले आहे. प्रशांत पाटील हा सध्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. डोंगरात अवैधपणे सुरू असलेली खाण बंद करण्याची मागणी प्रशांत पाटील आणि ग्रामस्थांनी केलेली आहे.

Body:खालापूर तालुक्यातील माडप हे गाव मुंबई  पुणे द्रुतगती मार्गाला लागून आहे. माडप गावातील डोंगरातुन रेल्वेचा बोगदा जात असून त्याठिकाणी दगड खाणही आहे. तर याच डोंगरात आदीवासी वाडीही आहे. डोंगरातील दगड खाणीचा ठेका हा शासकीय महसूल यंत्रणेने अवैधपणे प्रभाकर पाटील यांना दिलेला आहे. दगड खणीपासून 200 मीटर अंतर असलेल्या ठिकाणी कायदेशीररित्यास्फोट करता येत नाही. मात्र असे असताना ठेकेदार हा स्फोट घडवत आहे. डोंगर खाणी पासून 200 मीटरच्या आत आदिवासींची जुनी लोकवस्ती आहे. दगड खाणीत होत असलेल्या स्फोटाने आदिवासी वाडीवरील आदिवासीच्या घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दगड खाणीमुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या स्फोटाने रेल्वेच्या बोगद्यालाही धोका असल्याचे प्रशांत पाटील यांचे म्हणणे आहे.

Conclusion:
1987 साली ठेकेदाराला परवानगी नाकारली होती. 2013 ला शासनाने खाणपट्टा रद्द केला होता मात्र तरीही महसूल अधिकाऱ्यांनी अवैधपणे दगड खाणीला परवानगी दिली गेली आहे. 2017 ला माडप बोगद्याला स्फोटामुळे तडे जाण्याची शक्यता आहे असा अहवाल रायगड जिल्हाधिकारी यांनी दिला होता. मात्र तरीही खाणकाम सुरू असून येथील ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच माडप गावासह आजूबाजूच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली.

माडप येथील रहिवासी प्रशांत पाटील हे 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोनदा येऊन त्यांची भेट घेतली असून योग्य असे उत्तर मिळाले नसल्याने पाटील यांनी अद्याप उपोषण सोडलेले नाही. प्रशांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले आहे. खाण काम त्वरित बंद करून अवैधपणे केलेल्या उत्खननाची रॉयल्टी ठेकेदाराकडून वसूल करावी अशी मागणी प्रशांत पाटील यांनी केलेली आहे. न्याय मिळेपर्यत उपोषण सुरू राहील असा पवित्रा पाटील यांनी घेतला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता हा विषय कौटुंबिक असल्याचे बोलून वेळ मारून नेली आहे. त्यामुळे माडप ग्रामस्थांना न्याय मिळेल की नाही असा संशय निर्माण झाला आहे.

बाईट 1 : प्रशांत पाटील, उपोषणकर्ता
बाईट 2 : सीमा शेडगे, ग्रामस्थ
बाईट 3 : सुरेश गायकर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.