ETV Bharat / state

पोर्तुगीज गेले तरी रायगडमधील 'या' गावाने अजुनही जपली आहे पोर्तुगाली संस्कृती अन् भाषा - रायगड जिल्ह्यातील गावात अजूनही पोर्तुगीज संस्कृती व भाषेचे जतन

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात पोर्तगीज वंशांचे अडीचशे कुटूंब सातशे वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. आजही जुणे-जाणत्या व्यक्ती घरात पोर्तगीज भाषेचा वापर करत आहेत. पोर्तगीज हे कोर्लई येथून गेले असले तरी त्यांची भाषा, संस्कृती आजही कोर्लईतील पोर्तगीज कुटूंबानी जिवंत ठेवली आहे. कोर्लई गावातील या भाषेबाबत घेतलेला हा आढावा.

रायगडमधील 'या' गावाने अजुनही जपली आहे पोर्तुगाली संस्कृती अन् भाषा

author img

By

Published : Feb 3, 2021, 4:48 PM IST

Updated : Feb 5, 2021, 1:31 PM IST

रायगड - भाषा म्हटले की व्यक्तीमध्ये बोलण्याचा संवाद, प्रत्येक दहा किलोमीटरवर भाषा बदलली जाते असे म्हणतात. अशाच एका भाषेबाबत आपण माहिती घेणार आहोत. ही भाषा भारतात काही ठिकाणीच वापरली जाते. ती म्हणजे पोर्तगीज भाषा. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात पोर्तगीज वंशांचे अडीचशे कुटूंब सातशे वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. आजही जुने जाणत्या व्यक्ती घरात पोर्तगीज भाषेचा वापर करत आहेत. पोर्तगीज हे कोर्लई येथून गेले असले तरी त्यांची भाषा, संस्कृती आजही कोर्लईतील पोर्तगीज कुटूंबानी जिवंत ठेवली आहे. कोर्लई गावातील या भाषेबाबत घेतलेला हा आढावा.

रायगडमधील कोर्लईने जपली आहे पोर्तुगाली संस्कृती आणि भाषा
कोर्लईमध्ये होते पोर्तुगीजांचे साम्राज्य -
वास्को द गामाच्या रूपाने भारताच्या भूमीवर पोर्तुगीजांची पावले 1498 साली पडली. पोर्तुगीज यांनी केरळ पाठोपाठ गोवा, दीव दमण याठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांनी कोकणातही आपले पाय रोवले. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चौल आणि कोर्लई येथे आपले साम्राज्य निर्माण केले. 1505 मध्ये चौलमध्ये पोर्तुगीज यांनी प्रवेश केला. त्याकाळी पोर्तुगीज आणि निजाम असा संघर्ष होत असे. बुर्हान निजामाच्या मृत्यूनंतर दुसरा निजाम याने कोर्लई किल्ला बांधला. हा किल्ला 1594 मध्ये पोर्तुगीज यांनी जिकला. त्यानंतर कोर्लई येथे पोर्तुगीज याचे साम्राज्य प्रस्थापित झाले.
कोर्लईमध्ये आजही पोर्तुगीज कुटूंबे अस्तित्वात -
पोर्तुगीज यांनी स्थानिक मराठी जनतेला आपले गुलाम बनविले. त्यामुळे गुलामासोबत भाषेची निकड निर्माण झाली आणि त्यातून नव्या भाषेचा उगम झाला. पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तह झाल्यानंतर 1740 साली पोर्तुगीज आपल्या मायदेशात परत गेले. तरीसुद्धा पोर्तुगीज भाषा कोर्लई भागात आजही प्रचलित राहिली आहे. पोर्तुगीज गेले तरी त्यातील काही कुटूंबे जसे वेगस, मार्टिस, डिसोझा, रुजरिया, परेरा, पेना, रोच, गोम्स आणि फर्नाडिस ही आजही याठिकाणी वास्तव्य करून आहेत.मराठी आणि पोर्तुगीज भाषेतून निर्माण झाली 'क्रीओल' भाषा -
कोर्लई गावात रोमन कॅथलिक, हिंदू, मुस्लिम यांची वस्ती आहे. रोमन कॅथलिक लोक पोर्तुगीज भाषा आजही घरात आणि आपल्या समाजात वावरताना बोलत आहेत. ख्रिश्चन लोक बोलत असलेल्या भाषेला 'क्रीओल' असे संबोधले जाते. स्थानिक लोक तिला 'नौ लिनग' आमची भाषा असे म्हणतात. या भाषेचा उगम मराठी आणि पोर्तीगीज अशा मिश्रणातून झाला आहे. आजही येथील जुने वयस्क व्यक्ती पोर्तुगीज भाषेचा वापर करीत आहेत. तर नवी पिढीही भाषा बोलत असली तरी त्याच्या भाषेत मिश्र भाषेचा उच्चार होत आहे. मात्र असे असले तरी कोर्लई गावातील रोमन कॅथलिक हे आजही पोर्तुगीज याच्या भाषेचा वापर आणि संस्कृती जतन करीत आहेत.

Last Updated : Feb 5, 2021, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.