ETV Bharat / state

पनवेलमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी केले मतदान

मावळच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदार पार्थ पवार यांना नक्की कौल देतील, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.

पनवेलमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी केले मतदान
author img

By

Published : Apr 29, 2019, 11:25 AM IST

पनवेल - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज पनवेलमध्ये मतदान होत आहे. या मतदारसंघासाठी आमदार बाळाराम पाटील यांनी सकाळी नावडे हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान केले.

पनवेलमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी केले मतदान

मावळच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदार पार्थ पवार यांना नक्की कौल देतील, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. मावळ मतदारसंघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात लढत होत आहे.

पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात आठ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. विशेष म्हणजे पनवेल आणि उरणमध्ये मोदी लाट थोपविण्यात शेकापला यश मिळाले होते.

Intro:लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार बाळाराम पाटील यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात अतिशय चुरशीची लढत होतेय. मावळमधून पार्थ पवार यांना विजयी करण्याची मोहीम शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी उचलली आहे. Body:सामान्यांबरोबरच आमदार बाळाराम पाटील यांनी सकाळी नावडे हायस्कूलच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी अनेकांनी त्यांना पुढे येण्याची विनंती केली. मात्र, कोणताही बडेजाव न करता सामान्य मतदाराप्रमाणेच आमदार बाळाराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. मावळच्या विजसासाठी आम्ही कटिबद्ध असून मतदार पार्थ पवार यांना नक्की कौल देतील, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केलाय.
Conclusion:पनवेल आणि उरण या दोनही विधानसभा मतदारसंघातून पार्थ यांना मताधिक्य देण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले आहे. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात आठ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. विशेष म्हणजे पनवेल आणि उरणमध्ये मोदी लाट थोपविण्यात शेकापला यश मिळाले होते. एकंदरीत येथे लाल बावट्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पनवेल आणि उरणमध्ये पार्थ पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यात शेकाप यशस्वी होणार असंच चित्र दिसून येतंय.

बाईट- आमदार बाळाराम पाटील, शेकाप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.