ETV Bharat / state

पेणची श्रध्दा पाटील युक्रेनहून सुखरूप घरी पोहचली ; पालकांनी मानले सरकारचे आभार - रशिया युक्रेन विद्यार्थिनी

श्रद्धा पाटील ही युक्रेनमधील विनिस्थिया या ठिकाणी मागील वर्षभरापासून एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील शिक्षण घेत होती. मात्र अचानक रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिला आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतामध्ये परतावे लागले आहे. युक्रेनहून भारतामध्ये परतेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि भारत सरकारने कशाप्रकारे प्रयत्न केले याची सविस्तर माहिती यावेळी श्रद्धा पाटीलने माध्यमांशी बोलताना दिली.

पेणची श्रध्दा पाटील
पेणची श्रध्दा पाटील
author img

By

Published : Mar 5, 2022, 9:10 PM IST

Updated : Mar 5, 2022, 9:17 PM IST

पेण ( रायगड ) - मागील दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे ( India Ukraine war ) संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. शिक्षण व कामासंदर्भात अनेक देशांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील श्रद्धा किशोर पाटील ( Raigad girl Shraddha Patil ) ही विद्यार्थिनी आज ( शनिवार दि.5) सकाळी सुखरूप आपल्या घरी पोहोचली आहे. श्रद्धाचे वडील किशोर पाटील यांनी श्रद्धा घरी सुखरूप आल्यानंतर केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असताना केंद्र सरकारने मिशन गंगा ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू केले आहेत.

शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले याची खंत

शिक्षण अर्धवट सोडून भारतामध्ये परतावे लागले
श्रद्धा पाटील ही युक्रेनमधील विनिस्थिया या ठिकाणी मागील वर्षभरापासून एमबीबीएसच्या ( Shraddha Patil MBBS education ) पहिल्या वर्षातील शिक्षण घेत होती. मात्र अचानक रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिला आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतामध्ये परतावे लागले आहे. युक्रेनहून भारतामध्ये परतेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि भारत सरकारने कशाप्रकारे प्रयत्न केले याची सविस्तर माहिती यावेळी श्रद्धा पाटीलने ( Student Shraddha Patil reach at Raigad ) माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत ६५ नवे रुग्ण, सलग नवव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद

रायगडच्या दोन्ही विद्यार्थिनी युक्रेनमधून परत

रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी श्रध्दाची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी विद्यार्थ्यांना विदेशातून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रवि पाटील यांच्या माध्यमातून आपण केलेल्या विनंतीनंतर आणि पत्रव्यवहारानंतर केंद्रीय नागरी हवाई उद्योगमंत्री पृथ्वीराज सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रित पंचायत राज मंत्री कपिल पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यानंतर पेणसह रायगडच्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले.

हेही वाचा-Sharad Pawar On Ukraine Russia War : संयुक्त राष्ट्रात भारत तटस्थ राहिल्याने विद्यार्थ्यांना त्रास - शरद पवार

शिक्षण अर्धवट सोडून यावे लागल्याची खंत
विद्यार्थिनी श्रद्धा पाटील म्हणाले, की अचानक युक्रेन आणि रशियातील युद्ध सुरू झाल्यानंतर ते भारताच्या सीमेपर्यंत येईपर्यंतचा प्रवास खूप भयावह होता. अनेक दिवस-रात्र बंकरमध्ये काढल्या. त्यावेळी अन्न पाण्यासाठी खूप हाल झाले. मात्र त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगली मदत झाली आहे. मी आज सुखरूप घरी पोहोचू शकले. परंतु शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले याचीदेखील तेवढीच खंत वाटते.

हेही वाचा-Disha Salian Case : राणे पिता-पुत्र मालवणी पोलिसांसमोर हजर चौकशी सुरू

शिक्षण पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने व्यवस्था करावी - किशोर पाटील-
विद्यार्थिनीचे पालक किशोर पाटील म्हणाले, की माजी मंत्री रवि पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी तात्काळ केलेल्या पत्रव्यवहारानंतर देशपातळीवरच्या केंद्रीय मंत्र्यांनी माझ्या मुलीला सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी चांगले सहकार्य केले आहे. त्याबाबत मी भारत सरकारचे विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. मात्र देशातील या विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडून परतावे लागले आहे. हे शिक्षण भारतात पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने व्यवस्था करावी अशी विनंती करतो.

Last Updated : Mar 5, 2022, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.