रायगड - 2 मार्चला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकीला मोठ्या संख्येने भाविक पाली बल्लाळेश्वर चरणी दर्शनाला येत असतात. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाली बल्लाळेश्वर मंदिर 2 मार्चला अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष अॅड. धनंजय दातार यांनी केले.
हेही वाचा - कामगारांच्या हितासाठी आमचे झेंडे बाजूला ठेवू - सचिन अहिर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने पुन्हा नियम लागू केले आहेत. 2 मार्चला अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी पाली बल्लाळेश्वर येथे मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंदिर प्रशासनाच्या बैठकीत 2 मार्चला बल्लाळेश्वर मंदिर एक दिवस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावरील टेंट कॅम्पनिंग व्यवसायावर महसूलने फिरवला जेसीबी