ETV Bharat / state

मनसेवर राग; भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर प्राणघातक हल्ला (व्हिडिओ) - beaten

सोमवरी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. त्यांनतर या निवडणुकीदरम्यान एकमेकांप्रती असलेला द्वेष विकोपाला गेला. यातून हा हल्ला करण्यात आला.

मनसेवर राग; भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर प्राणघातक हल्ला
author img

By

Published : Apr 30, 2019, 2:00 PM IST

पनवेल - मनसे पक्षावर राग असल्याने पनवेलमधील भाजपच्या नगरसेवकाने मनसेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. विजय चिपळेकर असे भाजपच्या नगरसेवकाचे नाव असून ते पनवेल महापालिकेमधील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. २९ एप्रिलला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्ते होते.

मनसेवर राग; भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर प्राणघातक हल्ला

सोमवरी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. त्यांनतर या निवडणुकीदरम्यान एकमेकांप्रती असलेला द्वेष विकोपाला गेला. यातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले आहेत. गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस ठाण्यावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.

“वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागामुळे भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आहे.”, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत जाधव यांचे भाऊ महेश जाधव यांनी दिली आहे.

Intro:पनवेल

बातमीला व्हिडीओ सोबत जोडत आहे

मनसे पक्षावर असलेला राग काढण्यासाठी पनवेलमधील एका भाजप नगरसेवकाने 8 ते 10 कार्यकर्त्यांसोबत मनसैनिकावार हल्ला केलाय. पनवेल महापालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर असं या त्याचं नाव आहे. रूग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने त्यांचे प्राण बचावले. मात्र भाजपच्या या दहशतीमुळे पनवेल परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Body:काल लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. त्यांनतर या निवडणुकीदरम्यान एकमेकांच्या प्रति असलेला द्वेष विकोपाला गेल आणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा पारा अनावर झाला.

विजय चिपळेकर हे पनवेल महानगर पालिकेतील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. 29 एप्रिलला रात्री 12 वाजल्यानंतर विजय चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा गुंड कार्यकर्ते होते.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. शिवाय गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस स्टेशनवर दबाव आणत आहेत.Conclusion:“वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागामुळे भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आहे.”, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत जाधव यांचे भाऊ महेश जाधव यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.