रायगड - आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'चिझ' या डिजिटल मॅगझिनमध्ये महाडच्या मित डाखवेच्या फोटोला जून 2020 स्पर्धेतील तिसरे पारितोषिक मिळाले आहे. जून महिन्याच्या मॅगझिनमध्ये त्याचा फोटो प्रकाशीत झाला असून या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे मित डाखवेचे महाडमधून कौतुक होत आहे. मितच्या यशाने महाडसह रायगडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
चीझ मॅगझिन हे उत्कृष्ट फोटोलाच देते प्रसिद्धी -
चीझ हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रसिद्ध मॅगझिन आहे. संपूर्ण जगातील विविध भागातील छायाचित्रकार या मॅगझिनमध्ये आपला फोटो प्रकाशीत व्हावा, म्हणून खूप प्रयत्न करीत असतात. अतिशय कठिण अशा कसोटीवर फोटो निवडले जातात. फोटोचा विषय नसल्याने ही स्पर्धा अतिशय कठीण असते. आपला फोटो कोणत्या कसोटीवर निवडला जाईल, याचा कोणताही अंदाज नसतानाही फोटो काढणे हे एक कौशल्य असते.
कर्नाटकमधील रेड्याच्या स्पर्धेचा फोटो ठरला उत्कृष्ट -
कर्नाटकमध्ये कांबला नावाची एक स्पर्धा दरवर्षी होत असते. दक्षिण कन्नाडमधील रेड्यांची स्पर्धा हा एक पारंपारीक उत्सव असतो. तो साधारण नोव्हेंबर ते मार्च मध्ये घेतला जातो. या उत्सवातील मित डाखवे याने काढलेला फोटो चीझ मॅगझिनच्या स्पर्धेत निवडला गेला. या स्पर्धेत या फोटोला तिसरा क्रमांक मिळाल्याचे नुकतेच घोषीत करण्यात आले. मित डाखवे यांनी काढलेल्या फोटोत खळखळत्या पाण्यातील धावत्या रेड्यांचे प्रतिबिंब, हेच या फोटोचे वैशिष्ट्य आहे. यशमित डाखवेने यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे. चीझ मॅगझिनच्या या स्पर्धेतील त्याच्या यशामुळे महाड शहराचे नाव देखील उंचावले आहे. मित डाखवेचे याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - 'राज्यात सध्या अघोषित आणिबाणी'; हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांचा टोला