ETV Bharat / state

विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई - कोरोनाची परिस्थिती

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होत असताना सरकारने 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असून यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खालापूर पोलिसांनीही नाकाबंदी लावत विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सातत्याने सुरु केली आहे.

विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर खालापुर पोलिसांची कारवाई

author img

By

Published : May 16, 2021, 3:27 PM IST

रायगड - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त फिरण्यास मनाई केली आहे. तरीही अनेक जण नियम मोडतांना दिसत आहे. यामुळे खालापूर तालुक्‍यातील पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 41 वाहनांवर कारवाई करत 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच 4 वाहने जप्त करत 9 जणांवर विनामास्कची कारवाई केली आहे.

विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर खालापुर पोलिसांची कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

खालापूर पोलिसांनी मुंबई-पुणे हायवेवर खालापूर फाटा येथे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांची तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारावाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल विभूते, सहपोलीस निरीक्षक लव्हे, पोलीस उपनिरीक्षक राजपूत, स्वप्निल सावंतदेसाई, सहफौजदार पवार, पोलीस नाईक खराडे, पोलीस कॉस्टेबल समीर पवार आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.