रायगड - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली जनआशीर्वाद यात्रा आज रविवारी चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात १५ व १६ सप्टेंबर दोन दिवसांसाठी दाखल होणार आहे. यावेळी आदित्य हे जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक कामाला लागले आहेत. यात्रेच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात तीन विजयी संकल्प मेळावे व चार ठिकाणी स्वागत सभा होणार आहेत. तर विजयी संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीसाठी दोषी नाहीत, तो त्यांचा हक्क आहे - आदित्य ठाकरे
आज (रविवारी) सायंकाळी साडेपाच वाजता यात्रेचे आगमन जिल्ह्यातील माणगाव येथे होणार आहे. त्यानंतर तेथे स्वागत झाल्यानंतर आदित्य अलिबाग येथे वस्तीला थांबणार आहे. 16 सप्टेंबर रोजी अलिबाग, पेण, कर्जत याठिकाणी विजयी संकल्प मेळावा होणार आहे. तर पेण, खोपोली रोड व रसायनी याठिकाणी स्वागत सभा होणार आहेत. पक्षाची जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यात येत असल्याने शिवसैनिकामध्ये नवचैतन्य संचारले आहे.
हे ही वाचा - 'छत्रपती' ही उपाधी महत्वाची; त्या मागचा व्यक्ती नाही, रोहित पवारांचा उदयनराजेंना टोला