पनवेल - इंग्रज गेले, पण जाताना चहा सोडून गेले, असं आपल्या घरातील वडीलधारे लोक म्हणायचे. तरीही नुसते नाव काढल्यावर आपल्याला तरतरी आणणारे पेय म्हणजे चहा. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत 'कटिंग' हा आवाज कानी नक्कीच पडतो. आता सुरू असणारा हिवाळ्याचा, थंडीचा महिना.. गार गार वारे.. बोचणारी थंडी.. आणि झोपेतून उठल्याबरोबर हवा असणारा गरमा गरम चहा. याच चहाला हायटेक होताना तुम्ही पहिलंय.. पण पनवेलमध्ये मिळणार हा चहा ग्लॅमरस आहे आणि इथल्या वेगवेगळ्या चहाच्या प्रकाराची नावं ही तितकीच ग्लॅमरस. पनवेलच्या टपालनाका येथे पनवेल उपहार गृहामध्ये एक कटिंग असं म्हणण्याऐवजी येथे एक हेमा चहा, एक माधुरी चहा अशी ऑर्डर देतात.
हेही वाचा - पनवेलमध्ये पंतप्रधान आवास योजनेला कामोठेकरांचा ब्रेक
पनवेलमधले वासुदेव कपिलेश्वर यांनी गेल्या 50 वर्षांपासून ग्राहकांना ग्लॅमरस चहाचे वेड लावले आहे. पूर्वी येथे त्यांनी स्वतः बनवलेल्या चहाच्या मसाल्यापासून तयार केलेला चहा सुरू केला आणि या चहाला नाव दिलं हेमा चहा. त्यावेळची ग्लॅमरस अभिनेत्री अर्थात ड्रीम गर्ल हेमा मालिनीची बॉलिवूडमध्ये लोकप्रियता अगदी शिखराला पोहोचली होती. ड्रीम गर्ल हेमा मालिनीचे फॅन्सही भरपूर होते. म्हणून त्यांनी त्यांच्या स्पेशल चहाला नाव दिलं हेमा चहा. या चहानं सर्वांनाच वेड लावलं. नेहमीचा ग्राहक लांबून दिसताच इथले कर्मचारी हेमा चहाच्या तयारीला लागतो.
चहा कुठेही प्यायला तरी त्यातून मिळणारं समाधान हे जास्त महत्त्वाचं असतं. सकाळपासून संपूर्ण दिवस ताजा आणि आनंदी जगायचा असेल तर चहावाचून दुसरा पर्याय नाहीच! बरोबर ना! म्हणूनच आजच्या जागतिक चहा दिनानिमित्त एक शायरी तर नक्की ओठांवर येते...
हेही वाचा - पनवेलचे सुशोभीकरण झाडांच्या मुळावर; वृक्षतोडीवर नागरिकांची नाराजी
'कॉफी पीने वालों ये तुम्हारी खता नहीं, चाय क्या चीज होती है तुमको पता नहीं!'
या हेमा चहाची संकल्पना नक्की सुचली तरी कशी ऐका हेमा चहाचे मालक वासुदेव कपिलेश्वर यांच्याकडून....