रायगड - डहाणू तालुक्यातील चिखले केंद्र शाळेच्या आवारातील कूपनलिकेतून शनिवारी सकाळी गरम पाणी येण्यास सुरुवात झाली. हे पाहण्यासाठी रविवारी दिवसभर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. गेल्या ३ महिन्यांच्या कालावधीतील ही दुसऱ्यांदा पुनरावृत्ती असून यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे.
शनिवारी सकाळी या कूपनलिकेतून गरम पाणी निघत असल्याचा अनुभव काही ग्रामस्थांना आला होता. मात्र, सायंकाळपासून हे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली, ती रविवारी पूर्ण दिवस होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना फलक लावण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी दीडच्या सुमारास डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पाणी नमुने गोळा करण्यासह, भूगर्भ तसेच जिल्हा आपत्ती विभागाला प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढवून ज्ञानाने समृद्ध-संपन्न नवी पिढी घडवली पाहिजे
हेही वाचा - किल्ल्यांवर येणाऱ्या मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई इशारा