ETV Bharat / state

पनवेलला पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी - कळंबोली

रस्त्यावर पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने काही भागामध्ये अर्ध्या फुटापर्यंत पाणी साचले होते. यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसाळ्यात वाहने घसरण्याच्या भीतीने तसेच साचलेल्या पाण्यात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालक कमी वेगात वाहन चालवित होते. या पावसामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता.

पनवेलला पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी
author img

By

Published : Jul 27, 2019, 4:25 AM IST

पनवेल - पनवेल शहराला मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. बेलापूर गावातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच या पावसाचा तडाखा वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून पनवेल बस डेपोमध्ये पाणी साचले होते, यामुळे लांब पल्ल्याच्या बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना बस डेपोमध्येच अडकून रहावे लागले.

पनवेलला पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी

मुसळधार पावसामुळे खारघर, कळंबोली, कामोठे, नविन पनवेल, कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग, पायोनिअर, मिडलक्लास सोसायटी, तालुका पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले होते. या मुसळधार पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. पनवेलमध्ये कळंबोली पुलाखाली पाणी साचल्याने, तसेच खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरही रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला.

Intro:बातमीला व्हिडीओ आणि फोटो सोबत जोडले आहेत.

पनवेल

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसानं पनवेल शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. बेलापूर गावातही पाणी भरले आहे. पनवेल बस डेपोमध्येही पाणी साठल्यामुळे
लांब पल्ल्याच्या एसटीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना एसटी डेपोमध्येच अडकून रहावे लागले. Body:ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. पनवेलमध्ये कळंबोली पुलाखाली पाणी साचले आहे, तर खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे तो बंद ठेवण्यात आला. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरही रेल्वे गाडय़ा उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला. स्त्यावर पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने काही भागांत अर्ध्या फुटापर्यंत पाणी साचले. उड्डाणपुलावर पडणारे पावसाचे पाणी देखील बाजूला असलेल्या रस्त्यावर पडत असल्याने तेथे पाणी साचत होते. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसाळ्यात वाहने घसरण्याच्या भीतीने तसेच साचलेल्या पाण्यात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक कमी वेगात वाहन चालवत होते. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या भागांत ठिकठिकाणी पाणी साठले आहे.

पायोनिअर, मिडलक्लास सोसायटी, तालुका पोलीस ठाणे हा भाग सखल असल्याने तेथे पाणी साचले होते. पावसाचे पडसाद पनवेल शहरात सर्वत्र उमटले. शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे ही अर्धवट असल्याने अधिक पाऊस पडल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अडथळा येत होता. Conclusion:उरण-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले. कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालय भागातील मार्गही जलमय झाला. येथील गावांत सखल भागात पाणी साचले होते. गणपती चौक, खिडकोळी नाका, मंगलमूर्ती आपार्टमेंट या भागांत पाणी साचले. उरण पूर्व विभागातील अनेक गावांत पाणी साचले. काही ठिकाणी रात्रभर वीजही गायब होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.