ETV Bharat / state

दुबईत अडकलेल्या भारतीय कामगारांसाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांची मदत - मसालाकिंग डॉ. धनंजय दातार मदत

रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीयन कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या 'अल अदिल ट्रेडिंग कंपनी'ने उचलला आहे.

Indians stranded in Dubai
दुबईत अडकलेले भारतीय
author img

By

Published : Jul 21, 2020, 12:57 PM IST

Updated : Jul 21, 2020, 1:03 PM IST

रायगड - कोरोना लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांच्या मदतीला मसालाकिंग डॉ. धनंजय दातार धाऊन आले आहेत. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीयन कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या 'अल अदिल ट्रेडिंग कंपनी'ने उचलला आहे. अडचणीत सापडलेल्या अधिकाधिक गरजू देशबांधवांना स्वखर्चाने मायदेशी सुखरुप पाठवण्याचा निर्धार डॉ. दातार यांनी केला असून हे मदतकार्य यापुढेही सुरू राहणार आहे.

दुबईतील लॉकडाऊन संपल्यावर अमिरातीतून भारतापर्यंत विमान वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, दुबई ते मुंबईदरम्यानची उड्डाणे बंद होती. काही दिवसांपूर्वी ही वाहतूक सुरू झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटनयासाठी गेलेले जवळपास ६५ हजार नागरिक दुबईत अडकून पडले आहेत. त्यामध्ये रोजगार गेलेल्या व पैशाअभावी निवारा गमावलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे. अल अदील कंपनीने सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून, अशा गरजू भारतीयांना स्वखर्चाने मायदेशी पोहचवण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात हजारो कुटुंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले गेले. संकटग्रस्त भारतीयांची घरी लवकर परतण्याची ओढ लक्षात घेऊन निर्धन कामगारांच्या विमान तिकीटाचा तसेच वैद्यकीय चाचणीचा खर्च कंपनीने उचलला. केरळ, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील ३ हजार पेक्षा जास्त अधिक गरजू बांधवांना भारतात घरी सुखरुप पोहचण्यासाठी मदत केली आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला असल्याचे, डॉ. धनंजय दातार यांनी सांगितले.

दुबईत अडकलेल्या मराठी कामगारांसाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी मदत केली

मोफत विमान तिकीट देताना खरोखर गरज असलेल्या व्यक्तींची निवड करण्याचे आव्हान होते. मराठी कामगारांना सुखरुप घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळवणे, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे, दुबईतील भारतीय दुतावासाशी समन्वय राखणे, अमिरात व भारत या दोन्ही देशांच्या कायद्याची चौकट पाळणे, चार्टर्ड फ्लाईटसाठी विमान कंपनीशी संपर्कात राहणे आदी कामांसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. अल अदील कंपनीच्यावतीने संचालक वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार यांनी आणि प्रवाशांच्या प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या धनश्री पाटील यांनी समन्वयाचे व प्रवासी निवडीचे काम केले. त्यानंतर सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली, अशी माहिती डॉ. दातार यांनी दिली.

परवानाविषयक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रॅव्हल्सच्या सुलेमान यांची मदत झाली. रोजगार गेलेल्या कामगारांपैकी ज्यांचे मासिक वेतन २ हजार दिऱ्हॅमपेक्षा कमी होते, अशा २ हजार व्यक्तींची यादी करुन त्यातून १८६ मराठी कामगारांची निवड करण्यात आली. हे कामगार महाराष्ट्राच्या विविध भागातील आहेत. ज्या गरजूंना या मदतीची गरज आहे त्यांनी स्वतः किंवा भारतातील नातलगांमार्फत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले.

कोण आहेत डॉ. धनंजय दातार -

'अल अदिल ट्रेडिंग'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे मूळचे महाराष्ट्रीयन आहेत. दुबईला जाण्यापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये सेल्समनचे काम केले होते. त्यानंतर त्यांनी दुबईला जाऊन एका किराणा दुकानामध्ये नोकरी स्वीकारली. कालांतराने दातार यांनी स्वत:चा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. सध्या डॉ. दातार यांचा आखाती देशांमध्ये दोन मसाल्यांचे कारखाने, दोन पिठाच्या मीलसह आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त ४० सुपरमार्केटची चेन डॉ. दातार चालवतात. दुबईतील सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांच्या समावेश होतो.

Last Updated : Jul 21, 2020, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.