रायगड - तौक्ते चक्रीवादळ हे रत्नागिरी जिल्ह्यात आले असून काही तासानंतर रायगडकडे सरकणार आहे. सद्य परिस्थितीत रायगडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रमाणात रिमझिम पाऊस पडत असून जोरदार वारे वाहत आहेत. समुद्रकिनारे हे खवळले असले तरी सद्यस्थितीत वादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसत नाही. वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत.
रायगडातील समुद्र अद्यापही शांत -
तौक्ते चक्रीवादळ जिल्ह्यात 16 मे रोजी धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र सद्य स्थितीत वादळ हे रत्नागिरीत घोंघावत आहे. त्यामुळे रायगडकडे वादळ पोहचण्यास रात्री 11 नंतर शक्यता आहे. वादळ समुद्रात होत असल्याने समुद्र खवळलेला असला तरी रायगडातील समुद्र शांत असून लाटा नेहमीप्रमाणे उसळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लाटा उसळून भरतीचे पाणी कुठेही घुसलेले नाही.
रायगड जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात बदल.. वादळाचा अद्याप कोणताही परिणाम नाही - तोक्ते चक्रीवादळ
तौक्ते चक्रीवादळ हे रत्नागिरी जिल्ह्यात आले असून काही तासानंतर रायगडकडे सरकणार आहे. सद्य परिस्थितीत रायगडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रमाणात रिमझिम पाऊस पडत असून जोरदार वारे वाहत आहेत. समुद्रकिनारे हे खवळले असले तरी सद्यस्थितीत वादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसत नाही.
![रायगड जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात बदल.. वादळाचा अद्याप कोणताही परिणाम नाही cyclone-tauktae-till-has-no-effect-in-raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11781409-thumbnail-3x2-raigad.jpg?imwidth=3840)