ETV Bharat / state

पनवेलमध्ये पावसाचा कहर; गाढी नदीच्या पाण्यात मोटारसायकलसह दाम्पत्य गेले वाहून

मुंबईसह संपूर्ण पनवेल शहरात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी नदी परिसरातील अनेक गावात घुसले आहे. नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत.

वाहून गेलेल दाम्पत्य
author img

By

Published : Jul 9, 2019, 7:03 PM IST

रायगड (पनवेल) - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आज या नदीवरील पुलावरून मोटारसायकलने प्रवास करणारे दाम्पत्य वाहून गेले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाकडून त्या दाम्पत्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गाढी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी

आदित्य हरिश्चंद्र आंब्रे आणि सारिका आदित्य आंब्रे असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. ते निर्मिती गार्डन परिसरात राहत असून त्यांचा डिसेंबर २०१८ मध्ये विवाह झाला होता. हरिश्चंद्र आज पत्नी सारिकासोबत गाढी नदीवरील अरुंद पुलावरून मोटारसायकलने प्रवास करत होते. मात्र, वाढत्या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे हे दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. यावेळी पुलाच्या बांधकामाचा पाय देखील वाहून गेला आहे.

परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्मिशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, दुपारी १२ वाजून देखील त्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला पाचारण करण्यात आले. त्याद्वारे त्या दाम्पत्याचा शोध सुरू आहे.

Intro:
बातमीला फोटो आणि व्हिडीओ पाठवत आहे.

पनवेल

गेल्या दोन दिवसांपासून सुरू मुसळधार पावसात पनवेलमधील अनेक गाव पाण्याखाली गेले असून पनवेलमधल्या गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे गाढी नदीच्या शेजारी असलेल्या उमरोली गावचा संपर्क तुटलाय. नदीलगतचा रास्ता देखील पाण्याखाली गेला आहे. यात मोटरसायकलवरून प्रवास करणारे दांपत्य देखील वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. सध्या या वाहून गेलेल्या संपत दाम्पत्याचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून शोध सुरू आहे. Body:आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे असून त्यांचा नुकताच डिसेंबर 2018 मध्ये विवाह झाला होता. मुंबईसह संपूर्ण पनवेल शहरात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी बाजूला असलेल्या अनेक गावात घुसले आहे. नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. निर्मीती गार्डन परिसरात राहणारे हरिश्चंद्र आंब्रे हे त्यांची पत्नी सरीकासोबत गाढी नदीवरील छोट्या पुलावरून मोटारसायकलने प्रवास करत होते. गाढी नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहसोबत हे दांपत्य देखील मोटसायकलसह वाहून गेले आहेत. यावेळी पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे.Conclusion:
तेथील स्थानकांनी ही घटना पाहताच लागलीच पोलीस व महसूल प्रशासनाला माहिती दिली.पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12 वाजेपर्येत त्यांचा तपास न लागल्यामुळे खोपोलीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) ला पाचारण करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक घटनास्थळी पोहचले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.