रायगड - जिल्ह्यात कोरोनाने मार्च 2020पासून शिरकाव केल्यापासून आजपर्यंत 3 हजार 84 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे 1 मार्च ते 29 मे 2021 या दुसऱ्या लाटेत तीन महिन्यात 1 हजार 330 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत 45 वर्षावरील आणि ज्येष्ठ नागरिक याना कोरोनाने मृत्यूच्या कवेत घेतले आहे. तर तरुणही या दुसऱ्या लाटेत मृत्यूला सामोरे गेले आहे. आतापर्यंत सात लहान मुलांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही रायगडकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे.
मार्च 2020पासून ते 29 मे 2021पर्यंत 3084 जणांचा मृत्यू
कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर तो हळूहळू रायगड जिल्ह्यात आला. मार्च 2020 साली कोरोनाची पहिली लाट आली. आता दुसरी लाट आली आहे. तिसरी लाट येण्याची संभावना आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. मात्र आरोग्य यंत्रणेला मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या लाटेत रोखता आलेले नाही. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा वर्षात 3 हजार 84 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये अठरा वर्षाखालील 7, अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील 423 पंचेचाळीस ते साठ 1 हजार 140 तर साठ वर्षावरील 1 हजार 510 जणांचा मृत्यू झाला आहे.
1 मार्च ते 29 मे 2021 दरम्यान दुसऱ्या लाटेत 1330 मृत्यू
कोरोनाची दुसरी लाट 1 मार्च 2021पासून सुरुवात झाली. या दरम्यान 36 हजार 487 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यापैकी 5 हजार 145 जणांना कोरोना लागण झाली होती. 1 मार्च ते 29 मे 2021 या तीन महिन्यात 1 हजार 330 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू जिल्ह्यात तीन महिन्यात झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच महिन्यात 303 जणांचा कोरोनाने मृत्यू
दुसरी लाट सुरू झाल्यानंतर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढू लागली. जानेवारी ते 26 मे 2021 या पाच महिन्यात 303 जणांचा कोरोनाने उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. जानेवारी 3, फेब्रुवारी 2, मार्च 12, एप्रिल 129 तर मे महिन्यात 156 मृत्यू झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात मृत्यूची संख्या शंभरी पार झाली आहे.
वयोमानानुसार जानेवारी ते मे दरम्यान जिल्हा रुग्णालयातील झालेले मृत्यू
जानेवारी ते मे महिन्यात 21 ते 30 वयोगटातील 5, 31 ते 40 वयोगटातील 12, 41 ते 50 वयोगटातील 58, 51 ते 60 वयोगटातील 80, 61 वर्षावरील 148 असे 303 जणांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
रायगड : पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू - Raigad corona death news
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा वर्षात 3 हजार 84 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये अठरा वर्षाखालील 7, अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील 423 पंचेचाळीस ते साठ 1 हजार 140 तर साठ वर्षावरील 1 हजार 510 जणांचा मृत्यू झाला आहे.