ETV Bharat / state

'त्या' चिमुरडीच्या मृतदेहाचे तुकडे करणारा आरोपी २४ तासात गजाआड - girl killed

हत्येचा तपास खोपोली पोलिसांनी २४ तासांच्या आत लावला असून एका संशयित आरोपीस अटक केल्याचे पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डीवायएसपी रणजित पाटील
author img

By

Published : Feb 15, 2019, 9:58 AM IST

रायगड - घरातून बेपत्ता झालेल्या ४ वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह शिळफाटा परिसरातील झुडुपात टाकल्याची घटना मंगळवारी खोपोलीमध्ये घडली होती. या चिमुरडीच्या हत्येचा तपास खोपोली पोलिसांनी २४ तासाच्या आत लावला असून एका संशयित आरोपीस अटक केल्याचे पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डीवायएसपी रणजित पाटील
undefined

बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शिळफाटा परिसरातील पटेल नगर येथील आडवाटेच्या झुडुपात या चिमुरडीच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळून आले होते. चिमुरडीचे धड आणि शीर वेगवेगळे करुन झाडीत फेकण्‍यात आले होते. या मुलीच्या शरीरावर चटके दिल्याच्या अनेक खुणा पोलिसांना आढळून आल्या. यावरुन तिचा नरबळी देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तिची अवस्था बघून तिच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय पोलिसांना होता.

खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेगाजे यांनी अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता, २४ तासात हत्या करणाऱ्या नराधमास अटक करण्यात यश मिळविले आहे. सदर आरोपी हा चिमुकलीच्या आईकडे घरी येत असल्याचे समजते. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याची माहिती मिळत आहे. आरोपीने गुन्हा कबुल केला असून याबाबत पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.

चार वर्षाच्या मुलीचा निर्घृण हत्या करणारा आरोपी चोवीस तासात गजाआड

रायगड : घरातून बेपत्ता झालेली चार वर्षाच्या मुलीचा निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात टाकल्याची घटना मंगळवारी खोपोलिमध्ये घडली होती. आशा या चिमुरडीच्या हत्येचा तपास खोपोली पोलिसांनी चोवीस तासांच्या आत लावला असून एका संशयित आरोपीस अटक केले असल्याचे डीवायएसपी रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शिळफाटा परिसरातील पटेल नगर येथील आडवाटेच्या झुडुपात या चिमुरडीच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळून आले. चिमुरडीचे धड आणि शीर वेगवेगळे करून झाडीत वेगवेगळया ठिकाणी फेकण्‍यात आले होते. चिमुरडीच्या शरीरावर चटके दिल्याच्या अनेक खुणा पोलिसांना आढळून आल्या. यावरुन तिचा नरबळी देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तिची अवस्था बघून तिच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय पोलिसांना होता.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेगाजे यांनी अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता चोवीस तासात चार वर्षीय आशाची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास अटक करण्यात यश मिळविले आहे. सदर आरोपी हा आशा हिच्या घरी येत असल्याचे समजते असून अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याचे समजते आहे.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबुल केला आहे. याबाबत पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.