ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर बसला अपघात, प्रवासी सुखरूप - अपघात

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर मुंबई-पंढरपूर बसला खालापूरजवळ अपघात झाला आहे.

अपघातग्रस्त बस
author img

By

Published : Aug 13, 2019, 12:47 PM IST

रायगड - मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर मुंबई-पंढरपूर बसला खालापूरजवळ अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुखरूप आहेत. प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासाठी पाठविण्यात आले आहे.

मुंबई येथून एसटी बस (एम एच ११ बी एल ९२८९) पंढरपूरकडे २३ प्रवाशांना घेऊन निघाली होती. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर-वावंढळ गावाजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आली होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनरने कट मारली. त्यावेळी चालक बस बाजूला घेताना टायर खराब असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली घसरली.

अपघातानंतर खालापूर पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसटी बसमधील २३ प्रवाशांना बाहेर काढून दुसऱ्या बसने पुढील प्रवासाला पाठवण्या आले. एसटी बसचे टायर हे खराब असल्याने हा अपघात झाला असून हा या बसचा दुसरा अपघात असल्याचे समजते. त्यामुळे एसटी प्रशासनाने बस प्रवाशांना घेऊन जाताना योग्य आहे की नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

Intro:
मुंबई पुणे महामार्गावर खालापूर जवळ बसला अपघात, जखमी कोणीही नाही

बसचे टायर खराब असल्याने झाला अपघात

रायगड : मुंबई पुणे जुन्या महामार्गावर मुंबई पंढरपूर बसला खलापूरजवळ कंटेनरने कट मारल्याने बसचे टायर खराब असल्याने स्लिप होऊन बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाहीत. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले आहे. या एसटी बसला या आधीही अपघात झाला होता.Body:मुंबई येथून एसटी बस (एमएच 11/बीएल 9389) पंढरपूरकडे 23 प्रवाशांना घेऊन निघाली होती. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर वांवढळ गावाजवळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली असता समोरून येणाऱ्या कंटेनरने कट मारली. त्यावेळी चालकाने बसला बाजूला घेताना बसचे टायर खराब झाले असल्याकारणाने गाडीवरील नियंत्रण चुकून बस रस्त्याच्या बाजूला स्लिप झाली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
Conclusion:अपघातानंतर खालापूर पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसटी बसमधील 23 प्रवाशांना बाहेर काढून दुसऱ्या बसने पुढील प्रवासाला पाठविले. एसटी बसचे टायर हे खराब झाले असल्याने हा अपघात झाला असून हा या बसचा दुसरा अपघात असल्याचे समजते. त्यामुळे एसटी प्रशासनाने बस प्रवाशांना घेऊन जाताना योग्य आहे की नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.