ETV Bharat / state

आयात नेत्यांमुळे भाजपात जुन्या नेत्यांची कोंडी; कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा - Rajesh Bhostekar

देशात व राज्यात भाजपची घोडदौड सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. तर अनेकजण अजूनही भाजपात येण्यासाठी इच्छुक आहेत. रायगड जिल्ह्यातही भाजपला अच्छे दिन येत असताना अलिबाग, मुरुड भाजपातील जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेते डावलत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजप प्रवेश करणाऱ्या नेत्यांमुळे जुन्या नेत्यांची कोंडी होत असल्याचीही चर्चा कार्याकर्त्यांमध्ये होत आहे.

भाजप कार्यालय, रायगड
author img

By

Published : Aug 1, 2019, 3:45 AM IST

Updated : Aug 1, 2019, 7:22 AM IST

रायगड - देशात व राज्यात भाजपची घोडदौड सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. तर अनेकजण अजूनही भाजपात येण्यासाठी इच्छुक आहेत. रायगड जिल्ह्यातही भाजपला 'अच्छे दिन' येत असताना अलिबाग, मुरुडमध्ये भाजपातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेते डावलत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजप प्रवेश करणाऱ्या नेत्यांमुळे जुन्या नेत्यांची कोंडी होत असल्याची चर्चा कार्याकर्त्यांमध्ये होत आहे.

आयात नेत्यांमुळे भाजपात जुन्या नेत्यांची कोंडी

याबाबत नाराज कार्यकर्त्यांनी भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदारसंघातील भाजपातील अंतर्गत वादाचा विषय चव्हाट्यावर आला आहे. अलिबाग तालुक्यात पूर्वी भाजपला पक्ष 5 ते 7 नेत्यांचा पक्ष म्हणून गणला जात होता. मात्र, तरीही पक्षातील जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष जपला होता. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपला जिल्ह्यात उभारी मिळण्यास सुरुवात झाली. अलिबागमध्येही भाजपने आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. भाजपमध्ये इतर पक्षाचे नेतेमंडळी आल्यानंतर पक्ष मजबूत होण्यास सुरुवात झाली.

एकीकडे अलिबाग मुरुडमध्ये पक्षाची ताकद वाढत असताना जुने निष्ठावंत कार्यकर्ते विकास काठे, संकेत जोशी, राजेश पाटील, देवेन सोनावणे, इफ्तिकार अत्तार यांना सतत डावलण्यात येत असल्याचा आरोप एका प्रसिध्दी पत्रकातून कार्यकर्त्यांनी केला आहे. तर मुरुड भाजप तालुकाध्यक्ष जयवंत अंबाजी यांना तडकाफडकी पदावरून काढल्यामुळे ते सुद्धा नाराज झाले आहेत. तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही स्वतःला राजकारणातील मातब्बर समजणारे वरिष्ठ नेते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना विकत असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे.

त्यामुळे कठीण काळात पक्षासोबत राहून एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना आता किंमत दिली जात नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे पक्षात आमच्यावर होणारा अन्याय थांबला नाही तर अलिबाग येथे असलेल्या भाजपच्या जिल्हा पक्ष कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

भाजपात आयाराम नेत्यांची भाऊगर्दी होत असताना जुन्या कार्यकर्त्यांना मात्र डावलले जात असल्याने पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र, अलिबाग मुरुडमधील भाजपच्या या वादामुळे जिल्ह्यात सध्या चर्चेला उधाण आले आहे.

Intro:अलिबाग तालुका भाजपमधील जुना नवा वाद चव्हाट्यावर

पक्षात डावलले जात असल्याचा जुन्या कार्यकर्त्याचा आरोप

कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

रायगड : देशात व राज्यात भाजपची घोडदौड सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, नेते पक्षात येते आहेत. तर अनेकजण अजून भाजपात येण्यासाठी इच्छुक आहेत. रायगड जिल्ह्यातही भाजपला चांगले दिवस दिसत असताना अलिबाग, मुरुड भाजपातील जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेते डावलत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत नाराज कार्यकर्त्यांनी भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदार संघातील भाजपातील अंतर्गत वादाचा विषय चव्हाट्यावर आला आहे. Body:अलिबाग तालुक्यात पूर्वी भाजपला पक्ष पाच ते सात नेत्यांचा पक्ष म्हणून गणला जात होता. मात्र तरीही पक्षातील जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष जपला होता. भाजपा 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपला जिल्ह्यात उभारी मिळण्यास सुरुवात झाली. अलिबागमध्येही भाजपने आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. भाजपा मध्ये इतर पक्षाचे नेतेमंडळी आल्यानंतर पक्ष मजबूत होण्यास सुरुवात झाली.

एकीकडे अलिबाग मुरुड मध्ये पक्षाची ताकद वाढत असताना जुने निष्ठावंत कार्यकर्ते विकास काठे, संकेत जोशी, राजेश पाटील, देवेन सोनावणे, इफ्तिकार अत्तार यांना सतत डावलण्यात येत असल्याचा अरोप एका प्रसिध्दी पत्रकातून या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर मुरुड तालुका भाजपा अध्यक्ष जयवंत अंबाजी याना तडकाफडकी पदावरून काढल्यामुळे ते सुद्धा नाराज झाले आहेत. तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही स्वतःला राजकारणातील धृतराष्ट्र समजणारे वरिष्ठ नेते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना विकत असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे. Conclusion:त्यामुळे कठीण काळात पक्षासोबत राहून एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना आता किंमत दिली जात नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे पक्षात आमच्यावर होणारा अन्याय थांबला नाही तर अलिबाग येथे असलेल्या भाजपाच्या जिल्हा पक्ष कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा हि त्यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

भाजपात आयाराम नेत्यांची भाऊगर्दी होत असताना जुन्या कार्यकर्त्यांना मात्र डावलले जात असल्याने पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र अलिबाग मुरुडमधील भाजपच्या या वादामुळे जिल्ह्यात सध्या चर्चेला उधाण आले आहे.

Last Updated : Aug 1, 2019, 7:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.