ETV Bharat / state

पनवेलमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा उधळला जनावरांना बेशुद्ध करून पळवून नेण्याचा डाव - Attempts to smuggle mock animals

पनवेलच्या खांदा कॉलनी परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट बैलाला बेशुद्ध करून पळवून नेण्याचा डाव प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे फसला. प्राणीमित्र मित्तल यांच्या सतर्कतेने बैलाची तस्करी करण्याचा डाव पुन्हा फसला.

पनवेलमधील मोकाट बेशुद्ध बैल
author img

By

Published : Nov 13, 2019, 11:11 AM IST

रायगड - पनवेलच्या खांदा कॉलनी परिसरात दुपारच्या वेळी रस्त्यावर फिरत असलेल्या मोकाट बैलाला बेशुद्ध करून त्याला पळवून नेण्याचा कट पनवेलमधील प्राणिमित्रांच्या सतर्कत्यामुळे हाणून पाडण्यात यश आले. कालच खारघरमध्ये जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचा प्रयत्न समोर आला होता. त्यानंतर आज पुन्हा खांदा कॉलनी परिसरात बैलाला बेशुध्द केले जात असल्याचा प्रकार घडल्याने पनवेल शहरात संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

मंगळवारी खारघरमध्ये रविशंकर शाळेसमोर दोन म्हशींना गुंगीचे औषध दिल्याने, या म्हशी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही म्हशींना शुद्धीवर आणून त्यांना त्यांच्या मालकाच्या ताब्यात ही दिले. या म्हशींची तस्करी करण्याचा डाव असल्याचा संशय येथील नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेला 24 तासही पूर्ण होत नाही तितक्यात पुन्हा आज खांदा कॉलनी परिसरात एक बैल बेशुद्धावस्थेत आढळून आला. या बैलाला देखील कोणीतरी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. यात गुंगीच्या औषधामुळे बैलाच्या आरोग्याची स्थिती गंभीर झाली होती. मात्र, पुन्हा एकदा येथील प्राणीमित्र मित्तल यांच्या सतर्कतेने बैलाची तस्करी करण्याचा डाव पुन्हा फसला.

पनवेलमधील मोकाट बेशुद्ध बैल

हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राणीमित्र मित्तल आणि शैलेश खोतकर या दोघांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पशुवैद्यकीय अधीकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. पशुवैद्यकीय अधीकाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी हजर राहून बेशुद्ध बैलावर उपचार करत त्याला शुद्धीवर आणले.

24 तासात दोन्ही ठिकाणी म्हशी आणि बैलाला गुंगीचे औषध दिल्याचा प्रकार पुन्हा समोर आल्याने परिसरात भीतीचे तसेच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेलमध्ये गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत असल्याचे या दोन्ही घटनांवरुन पुढे आले आहे. त्यामुळे जनावरे चोरणाऱ्यांचा पोलिसांनी लवकरात लवकरच शोध घ्यावा, अशी मागणी प्राणीमित्र शैलेश खोतकर यांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकारांची गांभीर्याने दखल घेत हे प्रकार करणार्‍यांना शासन करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Intro:सोबत व्हिडीओ आणि फोटोज जोडले आहेत

पनवेल

पनवेलच्या खांदा कॉलनी परिसरात दुपारच्या वेळी रस्त्यावर फिरत असलेल्या मोकाट बैलाला बेशुद्ध करून त्याला पळवून नेण्याचा कट पनवेलमधील प्राणिमित्रांच्या सतर्कत्यामुळे हाणून पाडण्यात यश आलं. कालच खारघरमध्ये जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचा प्रयत्न समोर आला होता. त्यानंतर आज पुन्हा खांदा कॉलनी परिसरात बैलाला बेशुध्द केले जात असल्याचा प्रकार घडल्यानं पनवेल शहरात संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. Body:काल खारघरमध्ये रविशंकर शाळेसमोर दोन म्हशींना गुंगीचे औषध दिल्याने या म्हशी या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर पशुवैद्यकीयांनी दोन्ही म्हशींना शुद्धीवर आणून त्यांना त्यांच्या मालकाच्या ताब्यात ही दिल. या म्हशींची तस्करी करण्याचा डाव असल्याचा संशय इथले नागरिक व्यक्त करीत आहेत. या घटनेला 24 तासही पूर्ण होत नाही तितक्यात पून्हा आज खांदा कॉलनी परिसरात एक बैल बेशुद्धावस्थेत आढळुन आला. या बैलाला देखील कोणीतरी गुंगीचे औषध करून बेशुद्ध करण्यात आलं होतं. यात गुंगीच्या
औषधामुळे बैलाच्या आरोग्याची स्थिती गंभीर झाली होती. परंतु पुन्हा एकदा इथल्या प्राणीमित्र मित्तल यांच्या सतर्कतेने बैलाची तस्करी करण्याचा डाव पुन्हा फसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राणीमित्र मित्तल आणि शैलेश खोतकर या दोघांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पशुवैद्यकीयांना घटनास्थळी पाचारण केलं. पशुवैद्यकीयांनी लागलीच घटनास्थळी हजर राहून बेशुद्ध बैलावर उपचार करत त्याला शुद्धीवर आणलं.

गेल्या 24 तासात दोन्ही ठिकाणी म्हशी आणि बैलाला गुंगीचे औषध दिल्याचा प्रकार पुन्हा समोर आल्याने परिसरात भीतीचे तसेच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेलमध्ये गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत असल्याचे या दोन्ही घटनांवरुन पुढे आले आहे. त्यामुळे जनावरे चोरणाऱ्यांचा पोलिसांनी लवकरात लवकरच शोध घ्यावा, अशी मागणी प्राणीमित्र शैलेश खोतकर यांनी केली आहे. Conclusion:पोलीस प्रशासनाने याप्रकारांची गांभीर्याने दखल घेत हे प्रकार करणार्‍यांना शासन करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.