रायगड - मागील आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्या एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या अशा ढिसाळ आरोग्य यंत्रणेमुळे आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र माझा वृत्त वाहिनीचे संपादक जेष्ठ पत्रकार, माथेरानचे माजी नगरसेवक संतोष पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
संतोष पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने 108 रुग्णवाहिकेने मुंबईकडे तातडीने पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने त्यांना चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर ऑक्सिजन अभावी त्यांची प्राणज्योत मालवली.
संतोष पवार हे मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस तसेच रायगड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते. पत्रकारितेसोबत समाजकार्यात त्यांचे चागले कार्य होते. आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे एका जेष्ठ पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला आहे. संतोष पवार यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ढिसाळ आरोग्य यंत्रणेमुळे आणखी एका पत्रकाराचा बळी... - कोरोना लागण पत्रकार मृत्यू रायगड
संतोष पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने 108 रुग्णवाहिकेने मुंबईकडे तातडीने पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.