रायगड - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी रायगडात मात्र ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत हे तिन्ही पक्ष अनेक ग्रामपंचायतीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. तर भाजप हा जिल्ह्यात स्वबळावर आणि नाराज सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना घेऊन निवडणुकीत उतरला आहे. शेकाप हा सुद्धा अनेक ठिकाणी स्वबळावर लढत आहे. तर मनसेही या निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देत आहे.
78 ग्रामपंचायतीत 612 जागांसाठी 1588 उमेदवार रिगणात
रायगड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. 88 पैकी 10 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. 78 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 844 सदस्य संख्येपैकी 612 जागांसाठी विविध पक्षाचे 1588 उमेदवार रिंगणात उतरून आपले नशीब अजमवित आहेत. 18 जानेवारीला ग्रामपंचायत मतमोजणीनंतर जिल्ह्यात कोणता पक्ष पुढे आहे, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यात आघाडी...! ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी - महाविकास आघाडी सरकार
राज्यात आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळथ आहे. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढत आहे, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप या सर्वानांचा स्थानिक निवडणुकीत विजयाची खात्री आहे.