ETV Bharat / state

काहीजण पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वितुष्ट आलं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar vs Sharad Pawar
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 1:37 PM IST

Updated : Dec 1, 2023, 4:51 PM IST

रायगड Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुली या वंशाचा दिवा असतात, मात्र मुलं हे वंशाचा दिवा असत नाही, असा काहींचा अनुभव आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. काहीजण पावसात भिजण्याचं नाटक करतात, असा जोरदार हल्लाबोल अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केला. कधीही संघर्ष न करणारे आता संघर्ष यात्रा काढतात, असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांनाही सोडलं नाही. यावेळी अजित पवार यांनी समान नागरी कायद्यावरही भाष्य केलं.

बारामती लोकसभा निवडणूक ताकदीनं लढणार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पावर गटाची मेळावा रायगडमध्ये सुरू आहे. या मेळाव्यात आज अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनं लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, रायगड, शिरुर, सातारा या मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणते लोकसभा मतदार संघ लढवणार आहे, याबाबत माहिती दिली. यात बारामती लोकसभा मतदार संघात लढवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लायकी जातीवरुन ठरत नसते, अजित पवारांचा जरांगेंना टोला : छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा मावळा हा जातीयवादी नसतो. महाराष्ट्रात अनेक जातीतील संत होऊन गेले. त्यामुळे आता एकमेकांची लायकी काढली जात आहे. मात्र माणसाची लायकी त्याच्या जातीवरुन ठरत नसते. माणसाची लायकी त्याच्या कर्तृत्वावरुन ठरत असते, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता मनोज जरांगेंना लगावला. यावेळी अजित पवार यांनी इतरांच्या ताटातील आपल्या ताटात ओढून घ्यायचं, अशी आपली संस्कृती नाही. त्यामुळे एकमेकांची जात काढून दंगली घडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.

हेही वाचा :

  1. राष्ट्रवादी खरी कोणाची? निवडणूक आयोगात आजपासून तीन दिवस होणार सुनावणी, शरद पवार राहणार हजर
  2. '15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही'; अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं

Last Updated : Dec 1, 2023, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.