ETV Bharat / state

शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..

नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तासच उरले आहेत. सरत्या वर्षाने आपल्याला काही चांगल्या, तर काही वाईट आठवणी दिल्या. रायगडकरांना हे वर्ष कसे गेले, याचा आमचे प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी घेतलेला हा आढावा..

A bid adieu to 2019 special report from raigad
शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..
author img

By

Published : Dec 31, 2019, 8:37 PM IST

रायगड - नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तासच उरले आहेत. सरत्या वर्षाने आपल्याला काही चांगल्या, तर काही वाईट आठवणी दिल्या.

शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..

आधी अवकाळी पाऊस, आणि नंतर आलेल्या महापुराच्या फटक्यामुळे शेतकरी तसेच मच्छिमारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. तर, महामार्गांवरील अपघातांचे प्रमाणही जास्तच राहिले आहे. दुसरीकडे, हे वर्ष राजकीय उलाढालींचे ठरले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांनंतरचे घडलेले नाट्य हे सगळेच चर्चेचा विषय ठरले.

रायगडकरांना हे वर्ष कसे गेले, याचा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी घेतलेला हा आढावा..

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये जल्लोषात झाले नववर्षाचे स्वागत; भारतात उरले अवघे काही तास..

Intro:सरते 2019 वर्ष शेतकरी, मच्छिमार आणि रायगड कराना आर्थिक नुकसानीचे ठरले

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडीचे ठरले

रायगड : 2019 वर्षाच्या निरोपासाठी आणि 2020 च्या आगमनाला काही तास उरले आहेत. 2019 साल हे रायगडकरांना अवेळी पावसाने शेतकऱ्यांना, मच्छीमारांना, नागरिकांना दुष्काळी, पुराचा फटका तर राजकारणाना आर्थिक चटके तसेच अपघाताच्या दुःखाने होरपळून जाणारे ठरले. येणारे 2020 साल हे रायगडसाठी तसेच देशासाठी भरभराटीचे जावो ही सदिच्छा.

Body:2019 साल हे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गेले. त्याचबरोबर अवेळी पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. मच्छीमारांनाही या अवेळी पाऊस, वादळाचा फटका बसला. तर अतिवृष्टीने जिल्ह्यात महाड, नागोठणे, रोहा, पेण, पनवेल, अलिबाग, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्याला पुराचा फटका बसला. अनेक कुटूंब पुराने बेघर झाली. त्यामुळे हे वर्ष रायगडमधील जनतेला आर्थिक नुकसानीचे गेले आहे.

Conclusion:जिल्ह्यात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई गोवा महामार्ग याठिकाणी अनेक अपघात होऊन शेकडो व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. लोकसभा, विधानसभा निवडणूक 2019 सालात झाल्याने काही राजकीय पक्षांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. तर काहींना या निवडणुकीने पुन्हा उभे राहण्याची संधी मिळून दिली आहे.

2019 साल हे शेतकरी, मच्छिमार, नागरिक आणि राजकीय मंडळी यांना आर्थिक नुकसानीचे गेले आहे. अवेळी आणि अतिवृष्टी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी येथील शेतकरी, मच्छिमार, नागरिक जिद्दीने उभा राहिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील नागरिक हे आता सतर्क झाले असून 2020 काळात येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासही नागरिकांसह प्रशासनही सज्ज झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.